शुक्रवारी दुपारी अंत्यसंस्कार
परभणी, 4 सप्टेंबर (हिं.स.)।
परभणी येथील विवेक नगर भागातील शिक्षक संघटनेचे नेते ज्येष्ठ नागरिक तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक विनायकराव बापुराव कुंडीकर यांचे गुरुवारी अल्पशः आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 81 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना, एक मुलगी, जावई असा परिवार आहे. दरम्यान, त्यांच्या पार्थीवार उद्या दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
कुंडीकर जिल्हा परिषद शिक्षक पतपेढीचे अनेक वर्ष संचालक व अध्यक्षही होते. तसेच, डॉ. कल्याणराव कुंडीकर व कैलास कुंडीकर यांचे ते वडील तर आकाशवाणीच्या निवेदिका सौ. सिमंतीनी कुंडीकर यांचे ते सासरे होते. विवेक नगर गृहनिर्माण सहकारी संस्थेचे ते सचिव होते. विवेक नगरातील वसाहत उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis