चंद्रपूर, 4 सप्टेंबर (हिं.स.)।
गणपती उत्सव व विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ५४० जणांविरूध्द हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शांतता अबाधित राहावी यासाठीच या सर्वांवर हद्दपारीची कारवाई केल्याचे पोलीसांनी स्पष्ट केले आहे.
चंद्रपूर व बल्लारपूर शहरात शनिवार ६ सप्टेंबर अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन आहे. तर रविवार ७ सप्टेंबर रोजी राजुर, मूल आणि वरोरा येथे आणि ८ सप्टेंबर रोजी भद्रावती, ब्रम्हपुरी येथे गणेश मूर्तीचे विसर्जन आहे. चंद्रपूर जिल्हा, महापालिका व पोलीस प्रशासनाने विसर्जनाची तयारी सुरू केली आहे.

---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव