नवी दिल्ली, 3 सप्टेंबर (हिं.स.) - कोल्हापूरच्या 46 वर्षीय ॲथलीट महेश्वरी सरनोबत यांनी युरोपमधील एस्टोनिया येथे पार पडलेल्या फुल आयर्नमॅन स्पर्धेत आपल्या चमकदार कामगिरीने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी 15 तासांमध्ये अतिशय कठीण अशा या स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली आहे.
महेश्वरी यांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत 3 अत्यंत कठीण टप्पे होते. यामध्ये 3.8 किमी पोहणे हा एक टप्पा होता. तर 5 अंश तापमानाच्या गोठवून टाकणाऱ्या समुद्रात पोहण्याची परीक्षा होती. 180 किमी सायकलिंग तेही प्रचंड थंड हवामानात आणि वादळी वाऱ्यांचा सामना करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते त्याचप्रमाणे 42.2 किमी मॅरेथॉन पूर्ण अंतराच्या मॅरेथॉनचाही यामध्ये समावेश होता. महेश्वरी यांनी हे सर्व टप्पे पार करत केवळ 15 तासांत ही स्पर्धा पूर्ण करण्याची किमया साधली.
महेश्वरी सरनोबत यांची ही कामगिरी म्हणजे केवळ एक क्रीडा कामगिरी नाही. तर प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द आणि प्रचंड सहनशक्तीचा प्रेरणादायी उदाहरण आहे. जगभरातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतात. कठीण हवामान आणि अवघड मार्गामुळे अनेकांना शेवटपर्यंत पोहोचता येत नाही. पण महेश्वरी यांनी आपल्या ही स्पर्धा पूर्ण करत आपला वेगळा ठसा उमटवला आहे. महेश्वरी सरनोबत या भारताच्या काही मोजक्या खेळाडूंमध्ये आहेत. ज्यांनी इतक्या कठीण परिस्थितीत आंतरराष्ट्रीय स्तरावर फुल आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे