बीसीसीआय नमन पुरस्कार २०२६ : राहुल द्रविड, मिताली राज, रॉजर बिन्नी यांचा सर्वोच्च सन्मान
नवी दिल्ली, 14 मार्च (हिं.स.) बीसीसीआयचे वार्षिक पुरस्कार रविवारी दिल्लीत प्रदान केले जाणार आहेत. गेल्या वर्षीच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी शुभमन गिलला वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्काराने सन्मानित केले जाईल, तर राहुल द्रविड, मिताली राज आणि रॉजर ब
बीसीसीआय


नवी दिल्ली, 14 मार्च (हिं.स.) बीसीसीआयचे वार्षिक पुरस्कार रविवारी दिल्लीत प्रदान केले जाणार आहेत. गेल्या वर्षीच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी शुभमन गिलला वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्काराने सन्मानित केले जाईल, तर राहुल द्रविड, मिताली राज आणि रॉजर बिन्नी यांना कर्नल सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. बीसीसीआयने घोषणा केली की, यावर्षी तीन दिग्गजांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाईल.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सांगितले की, या वर्षीच्या समारंभात, रॉजर बिन्नी आणि राहुल द्रविड यांना कर्नल सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाईल. भारतीय क्रिकेटमध्ये उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल बीसीसीआयचा हा सर्वोच्च सन्मान आहे. मिताली राज यांना महिलांसाठी बीसीसीआय जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे,.जो भारतातील महिला क्रिकेटच्या विकासात आणि त्याच्या जागतिक ओळखीसाठी तिच्या अपवादात्मक योगदानाची दखल घेतो.

नमन पुरस्कारांमध्ये २०२४-२५ हंगामात आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत आणि वयोगटातील क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्रिकेपटूंनाही गौरविण्यात येणार आहे. भारताचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार शुभमन गिल याला २०२४-२५ हंगामासाठी दुसऱ्यांदा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू (पुरुष) साठी पॉली उम्रीगर पुरस्कार मिळेल. स्मृती मानधना तिच्या कारकिर्दीत पाचव्यांदा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू (महिला) पुरस्कार मिळणार आहे.

देशांतर्गत क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांमध्ये, मुंबईच्या सुश्री इरा जाधवला फलंदाजीत उत्कृष्ट हंगामात कामगिरी केल्यानंतर सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूसाठी जगमोहन दालमिया करंडक मिळेल. हरियाणाच्या शेफाली वर्माला २०२४-२५ हंगामासाठी सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू (वरिष्ठ देशांतर्गत एकदिवसीय) साठी जगमोहन दालमिया करंडक मिळेल.

मुंबईच्या आयुष म्हात्रेला २०२४-२५ हंगामासाठी देशांतर्गत मर्यादित षटकांच्या स्पर्धांमध्ये 'सर्वोत्तम ऑलराउंडर' म्हणून लाला अमरनाथ पुरस्कार मिळेल, तर विदर्भाच्या हर्ष दुबेला २०२४-२५ हंगामासाठी रणजी ट्रॉफीमध्ये 'सर्वोत्तम ऑलराउंडर' म्हणून लाला अमरनाथ पुरस्कार मिळणार आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनला पुन्हा एकदा बीसीसीआयच्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये 'सर्वोत्तम कामगिरी' पुरस्कार मिळेल, या हंगामात त्यांनी चार ट्रॉफी जिंकल्या आहेत आणि दोनमध्ये उपविजेतेपद मिळवले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande