पुणे मनपा प्रभाग रचनेवरून काँग्रेस-शरद पवार गटाचे आरोप
पुणे, 3 सप्टेंबर (हिं.स.)। महापालिकेसाठी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभागरचनेवरून राजकीय वाद वाढले आहेत. प्रभागरचना करताना भारतीय जनता पक्षाने सरळ हस्तक्षेप केला असून, सर्वच प्रभागांची तोडफोड करून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केले आहे
PMC news


पुणे, 3 सप्टेंबर (हिं.स.)।

महापालिकेसाठी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभागरचनेवरून राजकीय वाद वाढले आहेत. प्रभागरचना करताना भारतीय जनता पक्षाने सरळ हस्तक्षेप केला असून, सर्वच प्रभागांची तोडफोड करून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केले आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने केला आहे.या रचनेविरोधात हरकती दाखल करण्यात आल्या असून, आवश्यकतेनुसार उच्च न्यायालयातही दाद मागण्यात येईल, अशी माहिती या दोन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांनी दिली.

काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार बापू पठारे, माजी आमदार दीप्ती चवधरी, अंकुश काकडे, गोपाळ तिवारी, अजित दरेकर, रवींद्र माळवदकर आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande