
बीड, 18 मार्च (हिं.स.)। येथे 28 मार्चपर्यंत शंकर भारती रामोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे .
हिंदू नववर्ष आणि रामनवमीच्या मुहूर्तावर बीड शहरात सरस्वती मठ, कृष्णराजनगरचे पीठाधीश्वर शंकर भारती महास्वामीजी यांच्या उपस्थितीत हा सोहळा २८ मार्च २०२६ या कालावधीत मोंढा रोडवरील रविराज मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे.
उत्सवादरम्यान दररोज पहाटे ५:३० वाजल्यापासून रात्री ८:३० वाजेपर्यंत विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत. यात प्रामुख्याने दैनिक कार्यक्रमात प्रातः नित्य पूजन, श्री चर्तुवेद पारायण, रामोत्सव विशेष कल्पोक्त पूजा, अष्टावधान सेवा आणि सायंकाळी नित्य पूजा होईल. विजय यात्रा स्वागत समिती, बीड तर्फे सर्व हिंदू बांधवांना आणि भाविकांना या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दर्शन आणि पूजेसाठी येताना भाविकांनी भारतीय पोशाखात यावे, असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
उत्सवाचा समारोप शनिवार, २८ मार्च रोजी सकाळी ४:३० वाजता महास्वामीजींच्या पूजन आणि आशीर्वचनाने होईल. त्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis