गेवराई तालुक्यातील धुमेगाव येथे शताब्दी महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी
बीड, 18 मार्च (हिं.स.)। गेवराई तालुक्यातील धुमेगाव येथे शताब्दी महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन मोठ्या भक्तीभावाने करण्यात आले आहे. दरम्यान या अखंड हरिनाम सप्ताहात रामायणाचायर्य संजय महाराज पाचपोर य
गेवराई तालुक्यातील धुमेगाव येथे शताब्दी महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी


बीड, 18 मार्च (हिं.स.)।

गेवराई तालुक्यातील धुमेगाव येथे शताब्दी महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन मोठ्या भक्तीभावाने करण्यात आले आहे. दरम्यान या अखंड हरिनाम सप्ताहात रामायणाचायर्य संजय महाराज पाचपोर यांच्या वाणीतून रामकथेचे निरूपण केले जाणार आहे.

या सप्ताहात दररोज पहाटे काकडा आरती, हरिनामाचा गजर, तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण सुरू राहणार आहे. सायंकाळी हरिपाठ, कीर्तन व प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून याची सुरुवात दि २६ मार्च ते दि २ एप्रिलपर्यंत आयोजन केले आहे. दि. २६ चैतन्य महाराज देगलुरकर, दि. २७ विशाल महाराज खोले, दि. २८ रोजी शिवाजी महाराज

नारायणगड, दि. २९ उमेश महाराज दशरथे, दि. ३० रोजी प्रकाश महाराज जवंजाळ, दि. ३० ज्ञानसिंधु संदिपान महाराज हसेगावकर, दि. ३१ रोजी पांडूरंग महाराज घुले, दि. २ एप्रिल रोजी सकाळी ११ते १ या वेळेत महंत स्वामी जनार्दन गुरु स्वामी निगमानंद महाराज क्षेत्र मस्येद्रगड संस्थान यांचे काल्याचे कीर्तन व नंतर महाप्रसाद होईल. गावातील ग्रामस्थ, तरुण मंडळे व महिला मंडळ यांच्या सहकार्याने हा धार्मिक सोहळा उत्साहात पार पडणार आहे. या धार्मिक सोहळ्यास भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande