अकोल्यात सराफा व्यापाऱ्याला मारहाण
अकोला, 11 मार्च (हिं.स.)। अकोला शहरात समाजकंटकांकडून व्यापाऱ्यांना विनाकारण त्रास देण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी कुलर चोरी करत असताना दुकानदाराने एका मुलाला हटकल्याने संतप्त नातेवाईकांनी दुकानदाराला शिवीगाळ करत मारहाण केली होत
Photo


अकोला, 11 मार्च (हिं.स.)। अकोला शहरात समाजकंटकांकडून व्यापाऱ्यांना विनाकारण त्रास देण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी कुलर चोरी करत असताना दुकानदाराने एका मुलाला हटकल्याने संतप्त नातेवाईकांनी दुकानदाराला शिवीगाळ करत मारहाण केली होती. त्यानंतर आता शहरातील सराफा गल्लीमध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली असून याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान ही घटना अकोला शहरातील नामवंत सराफा गल्ली परिसरात घडली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या घटनेत एक व्यक्ती रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी वाहनांची तोडफोड करताना दिसत आहे. कोणतेही कारण नसताना दुचाकी गाड्यांचे नुकसान केल्यानंतर संबंधित व्यक्ती जवळील एका दुकानात घुसली आणि सराफा व्यापाऱ्याला शिवीगाळ करत मारहाणही केली.या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. विशेष म्हणजे भीतीच्या वातावरणामुळे अनेक व्यापारी पोलिसांत तक्रार देण्यासही पुढे येत नसल्याचे समोर येत आहे. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.आता या व्हिडिओच्या आधारे पोलिसांकडून संबंधित व्यक्तीवर काय कारवाई केली जाणार, याकडे व्यापाऱ्यांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande