रसायनीत किरकोळ कारणावरून दगडफेक; दोघांविरोधात गुन्हा
रायगड, 04 मार्च (हिं.स.)। रसायनी पोलीस ठाणे हद्दीत चांवढोली गावाच्या शिवारात मारहाणीची घटना घडली. अग्निशामक कार्यालयाजवळ, सिद्धेश्वरी ते चावणे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत उभ्या असलेल्या टेम्पोच्या आडोशात थांबलेल्या फिर्यादीवर दोन जणांनी हल्ला केल्य
Stone pelting in Khamisa over minor reason; Case against two


रायगड, 04 मार्च (हिं.स.)। रसायनी पोलीस ठाणे हद्दीत चांवढोली गावाच्या शिवारात मारहाणीची घटना घडली. अग्निशामक कार्यालयाजवळ, सिद्धेश्वरी ते चावणे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत उभ्या असलेल्या टेम्पोच्या आडोशात थांबलेल्या फिर्यादीवर दोन जणांनी हल्ला केल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.

फिर्यादी (रा. चांवढोली, पोस्ट गुळसुंदे, पनवेल) हे संबंधित ठिकाणी उभे असताना आरोपी क्र. १ व २ यांनी “तू इथे का उभा राहतो?” असा जाब विचारत वाद घातला. वाद वाढल्यानंतर आरोपी क्र. १ (रा. कोलकम सोसायटी, रसायनी) यांनी फिर्यादीच्या कपाळावर दगड फेकून मारला, ज्यामुळे त्यांना दुखापत झाली.

त्यानंतर दोन्ही आरोपींनी मिळून फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या घटनेनंतर जखमीला उपचारासाठी पाठविण्यात आले. प्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. ३३/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), १२५(अ), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार पानपट्टे करीत आहेत. किरकोळ कारणावरून झालेल्या या मारहाणीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande