
छत्रपती संभाजीनगर, 11 जानेवारी (हिं.स.)। मराठवाडा विभागातील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यात खचलेल्या किंवा बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीसाठी शासनाने कमाल ३० हजार रुपये इतकी मदत मंजूर केली आहे. यामुळे १२,७४८ विहिरी होणार दुरुस्त होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे त्यानुसार मराठवाड्यातील १२ हजार ७४८ विहिरींच्या दुरुस्ती प्रस्तावाला मान्यता देत निधीची मागणी करण्यात आली. त्यानूसार विभागीय आयुक्तालयाच्या रोहयो विभागाने मागणीच्या ५० टक्के निधी म्हणजे ८ कोटी रुपये संबंधित जिल्ह्यांना वितरित केले आहेत. विहिरींचे काम पूर्ण होताच उर्वरित निधीही दिला जाणार असल्याचे रोहयोतर्फे नमूद करण्यात आले. मराठवाड्यात गेल्या वर्षी अतिवृष्टी, पुरामुळे ३२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पंचनामे पूर्ण झाल्यावर शासनाने टप्प्याटप्प्याने अनुदान मजूर केले. जिल्हा प्रशासनांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयाच्या रोहयो विभागाने मागणी केल्यानुसार पहिल्या टप्यात ३० हजार रुपयांपैकी १५ हजार रुपये प्रमाणे ८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. हा निधी विभागातील जिल्ह्यांना वर्गही करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून संबंधित लाभाथ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. बाधीत शेतकऱ्याने विहिरीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करताच उर्वरित ५० टक्के निधी खात्यावर वर्ग केला जाणार आहे. हा मदतनिधी डीबीटी प्रणालीद्वारे संबंधित बाधित शेतकऱ्यांना वाटप केले जात आहे. दरम्यान, अतिवृष्टी, पुराचा सिंचन विहिरींना देखील मोठा फटका बसला आहे. यात खचलेल्या किंवा बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीसाठी शासनाने कमाल ३० हजार रुपये इतकी मदत मंजूर केली आहे. प्रत्यक्ष दुरुस्तीचा खर्च किंवा ही कमाल मर्यादा यांपैकी जी रक्कम कमी असेल, ती शेतकऱ्याला देण्यात येईल. पात्रतेनुसार ज्या विहिरींचे पंचनामे झाले आहेत त्यांची दुरुस्ती या योजनेतून केली जाणार आहे. यासाठी बाधित शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले. तालुका पातळीवर प्रस्ताव एकत्रित केल्यानंतर त्याची जिल्हा पातळीवर तपासणी करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis