नांदेड : कंधारात उर्सनिमित्त कविसंमेलन, रसिकांची मनमुराद दाद
नांदेड, 11 जानेवारी (हिं.स.)।कंधार येथील प्रसिद्ध सुफी संत हजरत हाजिसय्याह सरवरे मगदुम रहे. यांच्या ७११ व्या उर्स निमित्त विशाल मुशायरा आणि हास्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदी, उर्दू व मराठी काव्यातून नामवंत कवींनी बोचऱ्या थंडीत राष्
नांदेड : कंधारात उर्सनिमित्त कविसंमेलन, रसिकांची मनमुराद दाद


नांदेड, 11 जानेवारी (हिं.स.)।कंधार येथील प्रसिद्ध सुफी संत हजरत हाजिसय्याह सरवरे मगदुम रहे. यांच्या ७११ व्या उर्स निमित्त विशाल मुशायरा आणि हास्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदी, उर्दू व मराठी काव्यातून नामवंत कवींनी बोचऱ्या थंडीत राष्ट्रभक्ती अन् एकात्मतेची ऊर्जा दिली. उपस्थित हजारो रसिकांनी मनमुराद दाद दिली.

कंधार येथे बडी दर्गाहा उर्स निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विशेष असलेला मुशायरा व हास्य कवी संमेलनाचे आयोजन आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वतीने आणि उर्स कमिटीच्या पुढाकाराने करण्यात आले होते. यात इस्माईल नजर व असरार चंदेलवी (मध्यप्रदेश), जोहर कानपूरी व असद बसत्वी (उत्तरप्रदेश), मरहूम मालेगावी (मालेगाव), ताल्ब सोलापूरी (सोलापूर), अलतमश तालीब (नांदेड), डॉ. गाझी असर (उमरखेड), जाहिद नय्यर (अमरावती), साबेर वसमती (वसमत), अरशद नुरी (कंधार) आदी कविंनी एकापेक्षा एक सरस अशा सामाजिक आशय असलेल्या, राष्ट्रभक्ती व राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यासाठी पोषक तसेच भ्रष्टाचार, राजकीय अपप्रवृत्ती आणि आतंकवाद यावर प्रहार करणाऱ्या काव्याचे सादरीकरण केले. जोहर कानपूरी (उत्तरप्रदेश) यांनी सादर केलेल्या काव्यातून हिंदु मुस्लिम एकतेचे महत्व अधोरेखित केले. सामाजिक सलोखा, शांतता, सद्भावनेवर भर दिला. त

अखीदत में लुटाया सरहदो पे तन बदन अपना, इसी धरती कि मिट्टी को बनाया है कफन अपना ! गुलों पर भी इन्ही के खून के कतरे चमकते है, शहिदों के लहु से ही महकता है वतन अपना ! अशा एकापेक्षा एक सरस असलेल्या वीर रस अन् भक्ती रसात रसिक बोचऱ्या थंडीत सुद्धा ओलेचिंब झाले. रसिकांची भरभरून दाद मिळाल्याने काव्य सादरीकरण बहरले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande