अमरावतीत संक्रांतीच्या खरेदीसाठी महिलांची गर्दी; यंदाही साहित्याच्या किंमती वाढ
अमरावती, 11 जानेवारी (हिं.स.)। अमरावती मकरसंक्रांत सणाच्या खरेदीसाठी महिलांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. सुटीची पर्वणी साधत तीळगुळ, हळदी कुंकवाच्या वस्तूंसह वाण खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती. मात्र, यंदाही साहित्याच्या किंमती वाढल्याने वस्त
संक्रांतीला खरेदीसाठी महिलांची गर्दी:यंदाही साहित्याच्या किंमती वाढल्या,  वाणाच्या विविध वस्तूंनी दुकाने सजरी


अमरावती, 11 जानेवारी (हिं.स.)। अमरावती मकरसंक्रांत सणाच्या खरेदीसाठी महिलांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. सुटीची पर्वणी साधत तीळगुळ, हळदी कुंकवाच्या वस्तूंसह वाण खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती. मात्र, यंदाही साहित्याच्या किंमती वाढल्याने वस्तू खरेदीसाठी महिलांनी हात आखडता घेतला आहे.

बुधवारी १४ जानेवारीला मकरसंक्रांत आहे. त्या निमित्ताने सुटीचा मुहूर्त साधत महिलांसह तरुणींची बाजारपेठेत गर्दी. बाजारातील रेडिमेड तीळगुळ, तिळाचे लाडू, चिक्की, गुळाची रेवडी, साखरफुटाणे खरेदीला यंदाही प्राधान्य देण्यात आले. संक्रांतीला हलव्याच्या दागिन्यांमध्ये मुकुट, बाजूबंद, अंगठी, झुमके वेल, झुमके, गजरे, मोहनमाळ, सुट्टे तनमणी, मंगळसूत्र, बांगडी, घड्याळ, नथ, छल्ला, हार, फुलगुच्छ, नेकलेस, अशा दागिन्यांना महिलांनी पसंती दिली. हळदी कुंकवाचे वाण खरेदीसाठी आकर्षक वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी अधिक होती. महिलांसाठी वर्षातील सर्वात मोठा व आनंदाचा सण म्हणून मकर संक्रातीचा सण ओळखला जातो.

या सणाला तीळगुळ द्या, गोड गोड बोला, असे म्हणत मकर संक्रातीचा सण साजरा केला जातो. शहरातील बाजारात तीळगुळासह विविध वस्तू विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. मात्र, यंदाही तीळगुळाचे भाव वाढले आहेत. अतिवृष्टीमुळे स्थानिक तीळाचे आवश्यक उत्पन्न मिळाले नाही. यामुळे तीळाचे भावही वाढले आहे. सध्या बाजारात रेडिमेड तीळगुळ १२० ते १६० रुपये प्रति किलोने मिळत आहे. गुळाच्या रेवडीची किंमत १५० रुपये किलो आहे. मात्र, संक्रातीला तिळाला अन्यसाधारण महत्व आहे. तसेच तीळगुळ आरोग्यासाठी सर्वात लाभदायक आहे. सध्या बाजारात तिळाचे भाव १६० ते २०० रुपये प्रति किलो असून, गुळ ४५ ते ८० रुपये किलो आहे.

साहित्य खरेदीला वेग मकर संक्रातीसाठी अनेक महिला एक महिन्यापासून तयारीला लागतात. साडी, रांगोळी चे डिझाइन तयार करणे, लुटण्यासाठी कोणती वस्तू ठेवायची, हळदी कुंकु, सुगड यासह इतर साहित्याचे नियोजन केले जाते. खरेदीसाठी तीन दिवस असल्याने महिलांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande