पतंग उडवताना नायलॉन मांजा टाळा, जीव वाचवा; महावितरणकडून मार्गदर्शन
नाशिक, 13 जानेवारी (हिं.स.)। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडवताना विशेष काळजी घेणे आवश्यक असून, नायलॉन मांजा वापरणे जीवावर बेतू शकते. विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी महावितरणतर्फे श्री टी. जे. चव्हाण माध्यमिक शाळा, सिडको येथे विशेष
पतंग उडवताना नायलॉन मांजा टाळा


नाशिक, 13 जानेवारी (हिं.स.)। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडवताना विशेष काळजी घेणे आवश्यक असून, नायलॉन मांजा वापरणे जीवावर बेतू शकते. विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी महावितरणतर्फे श्री टी. जे. चव्हाण माध्यमिक शाळा, सिडको येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी महावितरणच्या सुरक्षा व प्रशिक्षण केंद्राचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता (सुरक्षा) डॉ. जितेंद्रकुमार राठौर यांनी विद्यार्थी व शिक्षकांना सविस्तर मार्गदर्शन केले. नायलॉन मांजा वीज प्रवाही असल्याने तो विद्युत वाहिन्यांमध्ये अडकल्यास प्राणघातक अपघात होऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

यामध्ये विद्युत वाहिन्यांजवळ पतंग उडवणे किंवा अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न करणे टाळावे.

घरात जुनी वायरिंग बदलणे, एकाच सॉकेटमध्ये अनेक उपकरणे न जोडणे आणि सुरक्षेसाठी RCCB उपकरणाचा वापर करणे गरजेचे आहे. विद्युत धक्का बसल्यास काय करावे, याचे प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आले. तसेच पाऊस किंवा ओलावा असलेल्या ठिकाणी विद्युत यंत्रणेपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.

तातडीच्या मदतीसाठी महावितरणच्या टोल फ्री क्रमांकाचा वापर करण्याबाबत माहिती यावेळी देण्यात आली.

विद्यार्थ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची व शंकांची उत्तरे देण्यात आली.

सदर कार्यक्रम महावितरणच्या सुरक्षा व प्रशिक्षण केंद्राचे मुख्य महाव्यवस्थापक अरविंद भादीकर यांच्या निर्देशानुसार कार्यकारी अभियंता प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. विद्यालयाच्या प्राचार्य उज्वला माळी यांनी प्रास्ताविक केले, तर जितेंद्र गायकवाड यांनी नियोजनाची जबाबदारी सांभाळली. या कार्यशाळेला शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande