नाशिक : गैरहजर कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित
नाशिक, 13 जानेवारी (हिं.स.) : नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत निवडणूक कार्यक्रमातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले पहिले व दुसरे टप्प्यातील प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडले. मात्र, या प्रशिक्षणादरम्यान एकूण २४८ अधिकारी
गैरहजर कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची


नाशिक, 13 जानेवारी (हिं.स.) : नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत निवडणूक कार्यक्रमातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले पहिले व दुसरे टप्प्यातील प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडले. मात्र, या प्रशिक्षणादरम्यान एकूण २४८ अधिकारी विनापरवानगी गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आले आहे. निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची व कायदेशीर जबाबदारी असून, निवडणूक प्रशिक्षणास विनापरवानगी अनुपस्थित राहणे हे लोकप्रतिनिधित्व अधिनिय १९५१ चे कलम १३४ अंतर्गत शिस्तभंगास पात्र ठरणारे कृत्य आहे. त्या अनुषंगाने, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संबंधित गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येत असून, त्यांच्यावर योग्य ती शिक्षा लावण्यात येणार आहे, अशी माहिती नाशिक मनपा सार्वत्रिक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे. निवडणूक कामकाजात नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडून निवडणूक प्रक्रिया यशस्वी पार पाडावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande