
परभणी, 13 जानेवारी, (हिं.स.)। परभणी महानगरपालिका निवडणूक - २०२५ च्या अनुषंगाने तिसरे व अंतिम प्रशिक्षण उद्या बुधवारी(दि. १४)येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे होणार आहे.
या प्रशिक्षणात ३४१ मतदान केद्रांसाठी नियुक्त ४०४ पथकातील १ हजार ६१६ अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण व साहित्यवाटप होणार आहे. गुरूवारी होणा-या मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने ५ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या पथकात ९५ मास्टर ट्रेनरर्स, ६२ झोनल अधिकारी नेमण्यात आलेले आहे. प्रत्येक बुथवर एक महिला कर्मचारी नियुक्त करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक १५ मधील बुथ क्रमांक १९ महात्मा गांधी विद्यालय, एकतानगर शाळेत १ सखी/पिंक बुथ उभारण्यात आले आहे. तर प्रभाग क्रमांक १ मधील बुथ क्रमांक १८ शनिवार बाजार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात १ दिव्यांग बुथ उभारण्यात आले आहे. तसेच एक आदर्श बुथही उभारण्यात येत असल्याची माहिती मनपाच्या निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis