चांदूर बाजारमध्ये “राष्ट्र प्रथम प्रहार जनशक्ती पक्ष प्रणीत लोकशाही आघाडी”ची अधिकृत स्थापना
अमरावती, 14 जानेवारी (हिं.स.) । चांदूर बाजार येथे प्रहार जनशक्ती पक्षाने बहुमत मिळवल्याने नगर परिषदेत “राष्ट्र प्रथम प्रहार जनशक्ती पक्ष प्रणीत लोकशाही आघाडी” या नावाने अधिकृत गट स्थापन केला आहे. नगर परिषदेच्या एकूण २१ सदस्यांपैकी नगराध्यक्ष सौ. मन
चांदूर बाजार नगर परिषदेत प्रहार जनशक्ती पक्षाचा सत्तारूढ प्रारंभ  खुर्चीऐवजी स्वच्छता व रक्तदानातून सत्तेचा पहिला दिवस साजरा


अमरावती, 14 जानेवारी (हिं.स.) । चांदूर बाजार येथे प्रहार जनशक्ती पक्षाने बहुमत मिळवल्याने नगर परिषदेत “राष्ट्र प्रथम प्रहार जनशक्ती पक्ष प्रणीत लोकशाही आघाडी” या नावाने अधिकृत गट स्थापन केला आहे. नगर परिषदेच्या एकूण २१ सदस्यांपैकी नगराध्यक्ष सौ. मनीषा मनीष नांगलिया यांच्या नेतृत्वाखाली १६ सदस्यांचा गट तयार झाला आहे.

गटनेता म्हणून सचिन खुळे, स्वीकृत नगरसेवक म्हणून अजय मलिये व शेख नजीम (प्रिन्स), तर उपाध्यक्ष म्हणून शेख रहमान व शेख इब्राहिम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

सत्तेत येताच खुर्चीवर बसून कारभार सुरू करण्याऐवजी, प्रहार जनशक्ती पक्षाने नगर स्वच्छता व सामाजिक उपक्रमांद्वारे सत्तेचा नवा आदर्श राबविला. मा. ना. बच्चूभाऊ कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरात भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गाडगेबाबा मंदिर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बेलोरा ऑटो चौक, किसान पुतळा, जयस्तंभ चौक, नेताजी चौक व गांधी चौक याठिकाणी स्वच्छता कामकाज करण्यात आले.

स्वच्छता मोहिमेनंतर मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिर आयोजित केले गेले, ज्यात चांदूर बाजारातील तरुण, महिला व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शिबिरात सचिन खुळे, हेमंत कोंडे, अबुदादा वानखडे, एजाज भाई, तनवीर ताज, रहमान भाई, हाजी सोहेल, मुजफ्फर हुसेन, जमील आफताब सर, ॲड. आबिद हुसेन, जमील अहमद, गोपाल वानखडे, घनश्याम उसरबरसे, विनोद कोरडे व मनीष नांगलिया यांच्या प्रमुख उपस्थिती नोंदवली गेली.प्रहार जनशक्ती पक्षाने नागरिकांशी संपर्क साधत समाजसेवा व स्वच्छतेला प्राधान्य देऊन नगर प्रशासनात नवीन सत्तेचा आदर्श राबवण्याचे संकेत दिले आहेत.

-----------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande