
रत्नागिरी, 14 जानेवारी, (हिं. स.) : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ३७ व्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत परिवहन संवर्गाची अनुज्ञप्ती धारकांकरिता (परिवहन लायसन्सधारक) आठ दिवस मोफत नेत्रतपासणी शिबिर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
परिवहन अनुज्ञप्तीधारकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी केले आहे. शिबिराचा कालावधी असा - १५ जानेवारी २०२६ रोजी, १९ जानेवारी ते २२ जानेवारी २०२६ आणि २७ जानेवारी ते २९ जानेवारी २०२६ या कालावधीत योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण ठिकाण, हातखंबा ट्रॅक.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी