मकर संक्रांतीनिमित्त पतंगोत्सवाचे आकर्षण कायम
येवला, 14 जानेवारी (हिं.स.)। नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात मकर संक्रांतीच्या निमित्ताने साजरा होणारा येवला पतंग उत्सव हा एक भव्य तीन दिवसीय उत्सव आहे. पतंग उत्सव प्रेमींना पतंगाचे विशेष आकर्षण असलेल्या पतंगांमध्ये गोंडेन, कल्लेदार, डोळेदार, शेपट
मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी


येवला, 14 जानेवारी (हिं.स.)।

नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात मकर संक्रांतीच्या निमित्ताने साजरा होणारा येवला पतंग उत्सव हा एक भव्य तीन दिवसीय उत्सव आहे.

पतंग उत्सव प्रेमींना पतंगाचे विशेष आकर्षण असलेल्या पतंगांमध्ये गोंडेन, कल्लेदार, डोळेदार, शेपटीदार, लंगर, तुकडी, अर्धीचा, पाऊणचा, सव्वाचा, दीडचा, दोनचा, अडीचचा असे पतंगे चे प्रकार असून प्रत्यक्षात येवल्यात हे पतंग उडवले जातात.

मोठे पतंग उडवण्यासाठी वाघदोऱ्यासारखा भक्कम दोरा त्याला लावला जातो. जसेजसे संध्याकाळ होत जाते तसेच असे पतंग कमी होऊन फटाक्याची आतिश बाजी गगनात दिसायला सुरुवात होते.

दरम्यान गच्चीवर पतंग उडवतात, डीजेच्या तालावर नाचतात आणि फटाक्यांची आतषबाजी करतात, ज्यामुळे संपूर्ण शहर उत्साहाने भारले जाते.

या पतंग उत्सव दरम्यान शहरासह अनेक इतर राज्यातून व परदेशातून सुद्धा पतंग उत्सव प्रेमी येवल्यात आनंद लुटण्यासाठी येतात. महिलांचा यात विशेष सहभागामुळे उत्सव भोगी, मकर संक्रांती आणि करी या तीन दिवसांपर्यंत हा उत्सव सुरू आहे

येवला पतंग उत्सव म्हणजे पतंग उडवण्याचा आनंद, डीजेचा आवाज, फटाक्यांची रोषणाई आणि लोकांचा उत्साह यांचा एक अनोखा संगम असतो, जो येवल्याच्या सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. डीजे, गाणी, नाच आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने हा उत्सव अधिक रंगतदार होत जातो

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande