रत्नागिरी : दैवज्ञ हितवर्धक समाज कॅरम स्पर्धेत अभिषेक चव्हाणला दुहेरी मुकुट
रत्नागिरी, 14 जानेवारी, (हिं. स.) : येथील दैवज्ञ हितवर्धक समाजाने आयोजित केलेल्या रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने चौथी दैवज्ञ चषक जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा पार पडली. स्पर्धेत रत्नागिरीचा अभिषेक चव्हाण याने पुरुष एकेरी गटाचे व दुहेरी
रत्नागिरी : दैवज्ञ हितवर्धक समाज कॅरम स्पर्धेत अभिषेक चव्हाणला दुहेरी मुकुट


रत्नागिरी, 14 जानेवारी, (हिं. स.) : येथील दैवज्ञ हितवर्धक समाजाने आयोजित केलेल्या रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने चौथी दैवज्ञ चषक जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा पार पडली. स्पर्धेत रत्नागिरीचा अभिषेक चव्हाण याने पुरुष एकेरी गटाचे व दुहेरी गटाचे विजेतेपद मिळवले.

स्पर्धेत जिल्ह्यातून सर्व गटांतून १५० स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात अभिषेक चव्हाणने राहुल भस्मेविरुद्ध खेळताना २५ – २० व २५ - ००असा जिंकून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. स्पर्धेच्या दुहेरीच्या अंतिम सामन्यात रियाज अकबरअली व अभिषेक चव्हाण या जोडीने दिनेश पारकर व ओमकार मोरे या जोडीचा २०-०८, १७-११ असा सरळ दोन गेममध्ये विजय मिळवला. महिला गटाचे विजेतेपद स्वरा मोहिरेने स्वरा कदमचा कुमार गटाचे विजेतेपद मिळविले. रत्नागिरीच्या ओम पारकरने जैतापूरचा आर्यन राऊत याचा पराभव करून किशोर गटाचे विजेतेपद मिळविले. गुहागरच्या स्मित कदमने रत्नागिरीच्या नील जाधवचा व किशोरी गटाचे विजेतेपद राजापूरच्या निधी सप्रे हिने रत्नागिरीच्या श्रावस्ती कांबळेचा पराभव करून मिळवले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande