मतदान व मतमोजणीच्या दिवशी सर्व मद्यविक्री बंद
पालघर, 14 जानेवारी (हिं.स.)। राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया शांततेत, मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी कडक उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीव
मतदान पुर्व, मतदान व मतमोजणीच्या दिवशी सर्व मद्यविक्री बंद


पालघर, 14 जानेवारी (हिं.स.)। राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया शांततेत, मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी कडक उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर वसई–विरार महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी ‘ड्राय डे’ जाहीर करण्यात आला आहे.

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान तर शुक्रवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. या कालावधीत सार्वजनिक शांतता अबाधित राहावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वसई–विरार महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रकारच्या अबकारी अनुज्ञप्त्या वरील दिवशी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिले आहेत.

महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम, १९४९ आणि त्याअंतर्गत असलेल्या नियमांन्वये तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या ४ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या निर्देशांनुसार हे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार मतदान पूर्वीचा दिवस तसेच १५ जानेवारी २०२६ रोजी संपूर्ण दिवस आणि १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वसई–विरार महानगरपालिका क्षेत्रात कोणत्याही प्रकारची मद्यविक्री, वितरण किंवा सेवनासाठीची अनुज्ञप्ती सुरु राहणार नाही.

प्रशासनाकडून संबंधित विभागांना आदेशांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले असून, उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande