नाशिक-सिमेंटचा ट्रक उलटून आईसह दोन मुलांचा मृत्यू
नाशिक, 14 जानेवारी (हिं.स.)सिमेंटच्या विटा घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्यामुळे आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना मनमाड चांदवड मार्गावरती घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की, सिमेंटचे ब्लॉक (विटा) घेऊन एक ट्रक मनमाडकडून चांदवडच्या दिशेने येत हो
अपघात लोगो


नाशिक, 14 जानेवारी (हिं.स.)सिमेंटच्या विटा घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्यामुळे आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना मनमाड चांदवड मार्गावरती घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की, सिमेंटचे ब्लॉक (विटा) घेऊन एक ट्रक मनमाडकडून चांदवडच्या दिशेने येत होता. यावेळी हा ट्रक रस्त्यावरच पलटी झाल्याने अपघात घडला. यात एका महिलेला आणि तिच्या दोन चिमुकल्यांना आपले प्राण गमवावे लागले. अपघातातील मृत आणि जखमी हे मध्य प्रदेशातील मजूर असल्याचे समजते. तर चार जण जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande