अमरावती : अंजनगाव बारीत पाईपलाईन गळतीमुळे गढूळ पाणी पुरवठा
अमरावती, 14 जानेवारी (हिं.स.) । अंजनगाव बारी येथील जुनी पाईपलाईन अनेक ठिकाणी लिक झाल्यामुळे नागरिकांना गढूळ व दुषित पाणी पुरवठा होत आहे. ही समस्या गेल्या काही महिन्यांपासून निर्माण झाली असून, ग्रामपंचायत प्रशासनाकडे नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या
ग्रामपंचायतीचा कारभार ढेपाळला, बऱ्याच ठिकाणी पाइपलाइन लिकेज:नागरीकांवर ओढवली दूषित पाणी पिण्याची वेळ


अमरावती, 14 जानेवारी (हिं.स.) । अंजनगाव बारी येथील जुनी पाईपलाईन अनेक ठिकाणी लिक झाल्यामुळे नागरिकांना गढूळ व दुषित पाणी पुरवठा होत आहे. ही समस्या गेल्या काही महिन्यांपासून निर्माण झाली असून, ग्रामपंचायत प्रशासनाकडे नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत; मात्र अद्याप कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही.

गावातील घरपोच नळांद्वारे पुरवठा होणारे पाणी गेल्या काही दिवसांपासून गढूळ होत असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर धोका निर्माण झाला आहे. वार्ड क्रमांक ३ मधील पाहणीमध्ये अनेक ठिकाणी पाईपलाईन्स लिक झाल्या असल्याचे आढळले, तरी ग्रामपंचायत प्रशासनाने अद्याप गंभीर पाऊल उचललेले नाही.

गावकऱ्यांच्या तक्रारीनुसार, पाणी पुरवठा सुरळीत असलेल्या जलस्वराज्य-२ योजनेच्या काळात स्थिती चांगली होती, परंतु गेल्या पाच वर्षांत पाणी टंचाई जाणवू लागली आहे. नागरिकांचा आरोप आहे की गटविकास अधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांच्या नियंत्रणातील प्रशासन कामात ढासळले आहे.

संताजी जगनाडे तैलिक समितीचे अध्यक्ष गणेश नवखरे, उपाध्यक्ष सौरभ भांडे आणि सचिव रोशन जुमळे यांनी या संदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाला लेखी तक्रार दिली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी खर्च करणे आवश्यक आहे, जरी गावात पाणीपट्टीची वसुली फक्त ५० टक्के झाली असली तरी, पाणी हा अत्यंत महत्वाचा विषय असल्याने प्रशासनाने त्यावर खर्च करायला हवे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande