लातूरचा सुपुत्र भरत पवार 'प्राईड ऑफ यंग हिंदुस्तान' राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
लातूर, 14 जानेवारी (हिं.स.)। समाजाप्रती निस्वार्थ भावना आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत, लातूर जिल्ह्यातील गव्हाण (ता. रेणापूर) येथील भरत महादेव पवार यांना प्रतिष्ठित ''प्राईड ऑफ यंग हिंदुस्तान'' राष्ट्रीय पुरस्काराने मुंबईत गौरवण्यात आले. यंगि
लातूरचा सुपुत्र 'नॅशनल स्टार'! भरत पवार यांना 'प्राईड ऑफ यंग हिंदुस्तान' राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित


लातूर, 14 जानेवारी (हिं.स.)।

समाजाप्रती निस्वार्थ भावना आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत, लातूर जिल्ह्यातील गव्हाण (ता. रेणापूर) येथील भरत महादेव पवार यांना प्रतिष्ठित 'प्राईड ऑफ यंग हिंदुस्तान' राष्ट्रीय पुरस्काराने मुंबईत गौरवण्यात आले. यंगिस्तान फाउंडेशनच्या वतीने संपूर्ण भारतातून निवडल्या गेलेल्या अवघ्या १५ गुणवंत युवकांमध्ये महाराष्ट्रातून भरत पवार यांनी स्थान मिळवून जिल्ह्याचा नावलौकिक देशपातळीवर पोहोचवला आहे.

​उल्हासनगरमध्ये रंगला सन्मान सोहळा

​९ ते ११ जानेवारी दरम्यान उल्हासनगर, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य सोहळ्यात मेजर पवन कुमार थपलियाल आणि फाउंडेशनचे संस्थापक मिथिलेश यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार केवळ सन्मान नसून समाजसेवेची प्रेरणा देणारे प्रतीक आहे, असे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी काढले.

​समाजपरिवर्तनाचा 'भरत' मार्ग

​भरत पवार यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनापासूनच राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) माध्यमातून सामाजिक कार्याचा श्रीगणेशा केला. त्यांच्या कार्याचा आवाका थक्क करणारा आहे:

​कोविड योद्धा: कोरोना काळात जीवाची पर्वा न करता केलेली रुग्णसेवा.

​शिक्षण दूत: शाळाबाह्य मुलांना प्रवाहात आणून दिलेले मोफत शिक्षण.

​राष्ट्रीय अभियाने: जलसुरक्षा, एचआयव्ही जनजागृती, रस्ते सुरक्षा आणि 'शिक्षित भारत विकसित भारत' मोहिमेत सक्रिय सहभाग.

​प्रबोधन: वर्तमानपत्रांतून लेखणीच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवला.

सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

​या यशाबद्दल भरत यांचे वडील महादेव विनायक पवार, आई सौ. सुरेखा पवार, प्राचार्य डॉ. सुदाम पवार यांच्यासह गव्हाण ग्रामस्थांनी त्यांचे जंगी स्वागत केले आहे. एका ग्रामीण युवकाने मेहनतीच्या जोरावर मिळवलेले हे यश आजच्या तरुणाईसाठी दीपस्तंभ ठरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande