ठाकरेंचे सल्लागार सडके आणि हे रडके - आशिष शेलार
मुंबई, 15 जानेवारी (हिं.स.) - एखादा सराईत असतो त्या पद्धतीने उद्धव ठाकरे हे वारंवार निवडणुकीच्या दिवशीच पत्रकार परिषदा घेतायेत, त्यांच्या पत्रकार परिषदांना परवानगी होती का? त्या पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक यंत्रणेवर बोट ठेवलंय, त्यात त्यांचा रा
आशिष शेलार


मुंबई, 15 जानेवारी (हिं.स.) - एखादा सराईत असतो त्या पद्धतीने उद्धव ठाकरे हे वारंवार निवडणुकीच्या दिवशीच पत्रकार परिषदा घेतायेत, त्यांच्या पत्रकार परिषदांना परवानगी होती का? त्या पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक यंत्रणेवर बोट ठेवलंय, त्यात त्यांचा राजकीय हेतू त्यांना साध्य करायचा आहे.

त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले विधान हे निवडणूक आयोगाने पाहावं लागेल. हे विधान आचारसंहितेचा भंग आहे का? असा आक्षेप एँड आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी बोलताना नोंदवला.

उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला मंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. यावेळी ते म्हणाले की,

मुंबईत ज्यावेळेला मतदार जोमाने मतदान करतायेत, दीड वाजेपर्यंत ३० टक्के पार झालंय. मतदार, या यंत्रणा लोकशाहीवर विश्वास मजबुतीने ठेवून सहभागी होतायेत, त्यावेळेला हे आरडाओरडा का? ही अडकाठी का? हा स्पीडब्रेकर का? हा गतिरोध का? उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आणि त्यांनी केलेले आरोप हे निवडणूक यंत्रणा, निवडणुकीत सहभागी होणारे अधिकारी, मतदार यांना गतिरोध आहेत का? हा स्पीडब्रेकर आहे का? त्याच्यामागचा हेतू काय? ते प्रेस कॉन्फरन्स का घेतायेत? निवडणूक आयोगाने यावर लक्ष ठेवलं पाहिजे आणि हे वारंवार करतायेत, असे शेलार म्हणाले.

पहिल्यांदा दोन्ही ठाकरे बंधूंनी आरोप केला की, मतचोरी झाली. मग मतचोरीवरून मतदार यादीतल्या नावांची चोरी झाली. मग मतदार यादीतल्या नावांच्या चोरीनंतर, मतदार नोंदणीच्या असलेल्या एजन्सी आणि कंपन्या यामध्ये चोरी झाली. तेवढ्यावर थांबले नाहीत, मग दुबार मतदारी चोरी झाली हा आरोप केला. तेवढ्यावर थांबले नाहीत, मग मतदान यंत्रात चोरी आहे सांगितलं. तेवढ्यावर थांबले नाहीत, मग मतदान केंद्र निवड प्रक्रियेमध्ये चोरी आहे सांगितलं. तेवढ्यावर थांबले नाहीत, मग मतदान प्रक्रियेतल्या अधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये चोरी आहे सांगितलं. तेवढ्यावर थांबले नाहीत, मग प्रचार करण्याच्या नियम नियमावलीमध्ये चोरी आहे असं सांगितलं. तेवढ्यावर थांबले नाहीत, मग पाडू या यंत्रणेत चोरी आहे सांगितलं. तेवढ्यावर थांबले नाहीत, आता शाईवर चोरी आहे सांगितलं.

या एवढ्या चोऱ्या नाहीत. हा त्यांच्या बुद्धीतील हेराफेरीचा प्रकार आहे. यांच्या राजकीय मेंदूमध्ये केमिकल लोचा झाला आहे. बुद्धीतली हेराफेरी आहे, चोरी नाही! यांचे सल्लागार सडके आणि हे रडके, अशी अवस्था यांची झाली आहे, असा आरोपही यांनी केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande