रायगडमध्ये डिसेंबरचा ‘बिअर बूम’; वाइनला उतरती कळा
रायगड, 15 जानेवारी (हिं.स.)। डिसेंबर महिन्यात नाताळ व थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले होते. समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे, रिसॉर्ट्स, हॉटेल्स व कॉटेज पर्यटकांनी गजबजले होते. दहा लाखांहून अधिक पर्यटकांनी ज
डिसेंबर महिन्यात नाताळ व थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले होते. समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे, रिसॉर्ट्स, हॉटेल्स व कॉटेज पर्यटकांनी गजबजले होते. दहा लाखांहून अधिक पर्यटकांनी जिल्ह्याला भेट दिल्याने मद्यविक्रीत मोठी वाढ झाली. अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विशेष परवानेही देण्यात आले होते.  आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये ९ लाख ५१ हजार ३८१ बल्क लिटर देशी दारू, ९ लाख १४ हजार ४२६ बल्क लिटर विदेशी दारू, २४ लाख ९६ हजार ९६० बल्क लिटर बिअर आणि केवळ ६४ हजार ७५८ बल्क लिटर वाइन विकली गेली. यावरून बिअरची वाढती क्रेझ स्पष्ट होते.  विदेशी दारूच्या किमतीत तीस टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाल्याने मद्यपींनी बिअरकडे मोर्चा वळवला. ६५० रुपयांची बाटली ९०० रुपयांपर्यंत गेली असून, क्वॉर्टरमागेही लक्षणीय वाढ झाली आहे. वाढते पर्यटन, सण-समारंभ आणि महागलेली विदेशी दारू यांचा एकत्रित परिणाम म्हणून रायगड जिल्ह्यात डिसेंबरमध्ये बिअरची विक्री विक्रमी, तर वाइनची विक्री ढासळलेली असल्याचे चित्र समोर आले आहे.


रायगड, 15 जानेवारी (हिं.स.)। डिसेंबर महिन्यात नाताळ व थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले होते. समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे, रिसॉर्ट्स, हॉटेल्स व कॉटेज पर्यटकांनी गजबजले होते. दहा लाखांहून अधिक पर्यटकांनी जिल्ह्याला भेट दिल्याने मद्यविक्रीत मोठी वाढ झाली. अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विशेष परवानेही देण्यात आले होते.

आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये ९ लाख ५१ हजार ३८१ बल्क लिटर देशी दारू, ९ लाख १४ हजार ४२६ बल्क लिटर विदेशी दारू, २४ लाख ९६ हजार ९६० बल्क लिटर बिअर आणि केवळ ६४ हजार ७५८ बल्क लिटर वाइन विकली गेली. यावरून बिअरची वाढती क्रेझ स्पष्ट होते.

विदेशी दारूच्या किमतीत तीस टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाल्याने मद्यपींनी बिअरकडे मोर्चा वळवला. ६५० रुपयांची बाटली ९०० रुपयांपर्यंत गेली असून, क्वॉर्टरमागेही लक्षणीय वाढ झाली आहे. वाढते पर्यटन, सण-समारंभ आणि महागलेली विदेशी दारू यांचा एकत्रित परिणाम म्हणून रायगड जिल्ह्यात डिसेंबरमध्ये बिअरची विक्री विक्रमी, तर वाइनची विक्री ढासळलेली असल्याचे चित्र समोर आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande