
त्र्यंबकेश्वर, 15 जानेवारी (हिं.स.)। त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पंतप्रधानांना त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून निमंत्रण देण्यात आले आहे. गुजरातमधील ज्योतिर्लिंग श्री सोमनाथ येथे सोमनाथ मंदिर ट्रस्ट कडून भारतातील बारा ज्योतिर्लिंगाचे प्रतिनिधींना सोमनाथ स्वाभिमान पर्व या खास कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले होते. त्यात त्र्यंबकेश्वर देवस्थानचे वतीने श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त व पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे यांनाही विशेष निमंत्रित म्हणून बोलविण्यात आले होते. सदर कार्यक्रम प्रसंगी मनोज थेटे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा पर्वकाळात येण्याचे निमंत्रण दिले
या वेळी पुरोहित संघाचे कोषाध्यक्ष सुयोग देवकुटे उपस्थित होते. पंतप्रधानांना सिंहस्थ कुंभमेळ्याचे विशेष निमंत्रण पत्र सादर करून निमंत्रित केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV