
नवी दिल्ली, 15 जानेवारी (हिं.स.) दाक्षिणात्य अभिनेता आणि राजकारणी विजयला सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने त्यांना त्यांच्या जन नायगन चित्रपटाच्या सीबीएफसी प्रमाणपत्र प्रकरणाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय, सर्वोच्च न्यायालयाने २० जानेवारीपूर्वी या प्रकरणावर निर्णय घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाला दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, ते याचिकेवर सुनावणी करू इच्छित नाही. चित्रपटाचे निर्माते त्वरित सुनावणीची विनंती करत होते. त्यानंतर न्यायालयाने म्हटले की ते याचिकेवर त्वरित सुनावणी करणार नाही. न्यायालयाने याचिकाकर्त्याला मद्रास उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देशही दिले.
सीबीएफसीने अलीकडेच जन नायगन प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये कॅव्हेट दाखल केले आहे. सीबीएफसीने त्यांचे मत ऐकल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये अशी विनंती केली आहे. उल्लेखनीय आहे की, अभिनेता विजय भूमिका असलेल्या 'जन नायगन' चित्रपटाच्या निर्मात्यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या आदेशाविरुद्ध याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये न्यायालयाने चित्रपटाला 'यूए' प्रमाणपत्र देण्याचे आदेश देणाऱ्या एकल खंडपीठाच्या आदेशाला स्थगिती दिली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे