
अकोला, 16 जानेवारी, (हिं.स.)। राज्यातील 29 महापालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. अकोला महापालिकेच्या निवडणुकीत भाजप क्रमांक 1 चा पक्ष ठरला असून काँग्रेसनेही मुसंडी मारत दुसऱ्या क्रमांकावर आपले स्थान निश्चित केलं आहे. 80 जागांसाठी झालेल्या अकोला महापालिका निवडणुकीत भाजपाने 38 जागी विजय मिळविला आहे. ८० जागांपैकी 80 जागांचे निकाल लागले आहेत. त्यापैकी भाजपाने 38 जागा जिंकल्या आहेत. तर अकोला महापालिकेत काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे, काँग्रेस ने 21 जागांवर विजय मिळविला तर वंचित बहुजन आघाडी आणि उद्धवसेनेला फार चांगली कामगिरी करता आलेली नाही. स्वतंत्र लढत असलेल्या शिंदेसेनेला फारचा करिष्मा करता आलेला नाही. उद्धवसेनेचीही कामगिरी साधारणच राहिली आहे. भाजपासोबत युतीत लढत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षालाही चांगले प्रदर्शन करता आलेले नाही.
राज्यात काल म्हणजे 15 जानेवारीला 29 महानगरपालिकांसाठी मतदान झाले. आज 16 जानेवारीला त्याचे निकाल जाहीर झाले. आतापर्यंतच्या निकालानुसार आणि जाहीर झालेल्या विजयांनुसार महाराष्ट्रात सर्वत्र भाजपा, त्यापाठोपाठ उध्ववसेना तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि नंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मजल मारलेली दिसते. दरम्यान अकोला महापालिकेच्या निवडणुकीत 80 जागांपैकी भाजपने 38 जागी विजय मिळवत पहिला नंबर पटकावला आहे.. तर काँग्रेसनेही जोरदार आघाडी घेत 21 जागा जिंकल्या आहेत.. त्यापाठोपाठ ठाकरेंची सेना 6 जागांवर विजयी झाली तर वंचित बहुजन आघाडीला 5 जागांवर समाधान मानावे लागले. तर शिंदे सेना आणि अजित पवार गट फारसी कारगिरी करू शकला नाही. मात्र शरद पवार गटाने 3 जागी विजय मिळविला..
असा आहे निकाल!
अकोला महानगरपालिका-
एकुण जागा- 80
विजयी
भाजप - 38
शिवसेना शिंदे- 01
राष्ट्रवादी अजित पवार - 01
ठाकरे- 06
काँग्रेस- 21
मनसे-00
शरद पवार गट- 03
वंचित बहुजन आघाडी - 05
MIM 3
अपक्ष 1
शहर विकास आघाडी 01
एकूण 80 घोषित
अकोला महानगरपालिका
विजयी उमेदवारांची यादी
प्रभाग क्रमांक 1
1) अ : शेख अब्दुल्ला : काँग्रेस : विजयी
2) ब : अजरा नसरीन मकसूद खान : काँग्रेस
3) क : निलोफर खान : काँग्रेस : विजयी
4) ड : अब्दूल सलाम खान : काँग्रेस : विजयी
प्रभाग क्रमांक 2
5) अ : सीमा अंजुम : एमआयएम : विजयी
6) ब : शरद तुरकर : भाजप : विजयी
7) क : मैमूना बी : एमआयएम : विजयी
8) ड : सय्यद रहीम सय्यद हाशम : एमआयएम
प्रभाग क्रमांक 3
9) अ :शशिकला काळे : भाजप : विजयी
10) ब : नितू महादेव जगताप : भाजप
11) क : प्रशांत गोविंदराव जोशी : भाजप
12) ड : निलेश रामकृष्ण देव : वंचित
प्रभाग क्रमांक 4
13) अ : संदीप शेगोकार : भाजप : विजयी
14) ब : शिल्पा वरोकार : भाजप : विजयी
15) क : पल्लवी मोरे : भाजप : विजयी
16) ड : अभय खुमकर : शिवसेना उबाठा
प्रभाग क्रमांक 5
17) अ : विद्या खंडारे : भाजप : विजयी
18) ब : जयंत मसने : भाजप : विजयी
19) क : रश्मी अवचार : भाजप : विजयी
20) ड : विजय अग्रवाल : भाजप : विजयी
प्रभाग क्रमांक 6
21) अ : आरती घोगलिया : भाजप : विजयी
22) ब : हर्षद भांबेरे : भाजप : विजयी
23) क : निकिता देशमुख : भाजप : विजयी
24) ड : पवन महल्ले : भाजप : विजयी
प्रभाग क्रमांक 7
25) अ : सुवर्णरेखा जाधव : काँग्रेस
26) ब : चांद चौधरी : अपक्ष : विजयी.
27) क : किरण मेश्राम : जमीला बी : काँग्रेस
28) ड : शेख फरीद शेख करीम : काँग्रेस
प्रभाग क्रमांक 8
29) अ : सोनाली सरोदे : उबाठा : विजयी
30) ब : मनोज पाटील : उबाठा : विजयी
31) क : माधुरी क्षिरसागर : भाजप : विजयी
32) ड : राजेश्वर धोटे : भाजप : विजयी
प्रभाग क्रमांक 9
33) अ : प्रिया सिरसाट : काँग्रेस : विजयी
34) ब : निखत अफसर कुरेशी : काँग्रेस
35) क : कनिजा खातून : काँग्रेस : विजयी
36) ड : मोहम्मद फजलू पहेलवान : काँग्रेस
प्रभाग क्रमांक 10
37) अ : मंजुषा शेळके : भाजप : विजयी
38) ब : वैशाली शेळके : भाजप : विजयी
39) क : अनिल गरड : भाजप : विजयी
40) ड : नितीन ताकवाले : भाजप : विजयी
प्रभाग क्रमांक 11
41) अ : जैनब बी : काँग्रेस : विजयी.
42) ब : शाहीन अंजुम : काँग्रेस : विजयी.
43) क : फिरदोस परवीन : काँग्रेस : विजयी.
44) ड : डॉ. झिशान हुसेन : काँग्रेस
प्रभाग क्रमांक 12
45) अ :संतोष डोंगरे : भाजप : विजयी
46) ब : कल्पना गोटफोडे : भाजप : विजयी
47) क : उषा विरक : शिंदे सेना : विजयी
48) ड : सागर भारूका : उबाठा : विजयी
प्रभाग क्रमांक 13
49) अ : विशाल इंगळे : भाजप : विजयी
50) ब : प्राची काकड : भाजप : विजयी
51) क : सुनिता अग्रवाल : भाजप : विजयी
52) ड : आशिष पवित्रकार : अपक्ष : विजयी
प्रभाग क्रमांक 14
53) अ : उज्वला पातोडे : वंचित : विजयी
54) ब : जयश्री बहादूरकर : वंचित : विजयी
55) क : पराग गवई : वंचित : विजयी
56) ड : शेख शमसु शेख साबिर : वंचित : विजयी
प्रभाग क्रमांक 15
57) अ : हरीश अलिमचंदानी : भाजप :
58) ब : मनिषा भंसाली : भाजप :
59) क : शारदा खेडकर : भाजप : विजयी
60) ड : बाळ टाले : भाजप : विजयी
प्रभाग क्रमांक 16
61) अ : सिद्घार्थ उपर्वट : भाजप : विजयी
62) ब : अमरीन सदफ : राष्ट्रवादी शप
63) क : नर्गिस परवीन खान : राष्ट्रवादी अप
64) ड : रफिक सिद्दीकी : राष्ट्रवादी शरद पवार : विजयी
प्रभाग क्रमांक 17
65) अ : जया गेडाम : काँग्रेस : विजयी
66) ब : अमोल मोहोकार : भाजप : विजयी
67) क : रफिया बी : काँग्रेस : विजयी
68) ड : आझाद खान : काँग्रेस : विजयी
प्रभाग क्रमांक 18
69) अ : स्मिता कांबळे : काँग्रेस : विजयी
70) ब : अमोल गोगे : भाजप : विजयी
71) क :आर्शिया परवीन : काँग्रेस : विजयी
72) ड : फिरोज खान : काँग्रेस : विजयी
प्रभाग क्रमांक 19
73) अ : धनंजय धबाले : भाजप : विजयी
74) ब : गजानन सोनोने : भाजप : विजयी
75) क :योगिता पावसाळे : भाजप : विजयी
76) ड : पुजा गावंडे : राष्ट्रवादी शरद पवार
प्रभाग क्रमांक 20
77) अ : विजय इंगळे : उबाठा : विजयी
78) ब : सुरेखा काळे : उबाठा : विजयी
79) क : सोनाली अंधारे : भाजप : विजयी
80) ड : विनोद मापारी : भाजप : विजयी
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे