
अकोला, 16 जानेवारी (हिं.स.)। माजी गृहराज्यमंत्री डॉ रणजीत पाटील यांचे पुतणे आशिष पवित्रकार यांचं तिकीट कापल्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. यात त्यांनी भाजपचे उमेदवार अनिल मुरूमकर यांचा पराभव करीत विजय मिळविला आहे..
अकोल्यात गेल्या वेळी एकहाती सत्ता असलेल्या भाजपला तुलनेत कमी जागा मिळाल्या असून भाजपला 38 आणि मित्रपक्ष 01 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक आणि शिवसेना शिंदे गटाला एक अशा एकूण 41 जागा मिळाल्या आहेत.. अकोला महापालिकेत एकूण 80 जागा असून सत्ता स्थापनेसाठी 41 जागांची आवश्यकता आहे.. तर दुसरीकडे काँग्रेस सह महाविकास विकास आघाडीला 30 जागा मिळाल्या आहेत. तर एमआयएम 03 जागा तर वंचित बहुजन आघाडीला 05 जागा मिळाल्या एक अपक्ष निवडून आला आहे. मात्र अकोल्यात भाजपसह काँग्रेसनेही सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.. 80 नगरसेवक असलेल्या अकोला महापालिकेत नेमका कोणता चमत्कार घडतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.. तर माजी गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांचे पुतणे नवनिर्वाचित अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार हे नेमके कोणासोबत जाणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे..
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे