अल्प फरकाने काही जागा हुकल्या, पण संघर्ष सुरूच – आ. जोरगेवार
चंद्रपूर, 16 जानेवारी, (हिं.स.)। ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकतीने, एकजुटीने आणि सकारात्मकतेने लढलो. आमच्याकडे ठोस विकासकामांचा अजेंडा होता आणि त्याच आधारावर आम्ही थेट मतदारांपर्यंत पोहोचलो. मतदारांनी आमच्या कामावर विश्वास ठेवत उमेदवारांना मते दिली. म
अल्प फरकाने काही जागा हुकल्या, पण संघर्ष सुरूच – आ. जोरगेवार


चंद्रपूर, 16 जानेवारी, (हिं.स.)। ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकतीने, एकजुटीने आणि सकारात्मकतेने लढलो. आमच्याकडे ठोस विकासकामांचा अजेंडा होता आणि त्याच आधारावर आम्ही थेट मतदारांपर्यंत पोहोचलो. मतदारांनी आमच्या कामावर विश्वास ठेवत उमेदवारांना मते दिली. मात्र काही जागा अगदी अल्प फरकाने गमवाव्या लागल्या, त्यामुळे अपेक्षित आकडा गाठता आला नाही,” अशी प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.

पुढे बोलताना ते म्हणाले, “या निकालाचे आत्मपरीक्षण सर्व नेते व कार्यकर्ते मिळून नक्कीच करू. निवडून आलेले सर्व उमेदवार प्रभागातील शेवटच्या, गरजू घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी समर्पित भावनेने काम करतील, असा मला पूर्ण विश्वास आहे.”

“भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कधीही हरणारा नसतो, तो नेहमी लढणारा असतो. जनतेने दिलेला कौल आम्ही पूर्णपणे स्वीकारतो. या निकालातून बोध घेत शहरात भारतीय जनता पक्षाची संघटना पुन्हा अधिक भक्कमपणे उभी करून जनतेच्या सेवेत आम्ही सतत कार्यरत राहू,” असेही आमदार जोरगेवार यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande