
अकोला, 16 जानेवारी, (हिं.स.)। राज्यातील 29 महापालिकासह अकोल्यातील महापालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. अकोला महापालिकेच्या निवडणुकीत भाजप क्रमांक 1 चा पक्ष ठरला असला तरी कुणालाही अकोल्यात स्पष्ट बहुमत नसल्याचं चित्र आहे. भाजपसह महायुती 40 जागांवर थांबली आहे. अकोल्यात 41 ही मॅजिक फिगर असून येथे बहुमत न मिळाल्याने सत्ता स्थापनेसाठी भाजपासह काँग्रेसच्या हालचाली वाढल्या आहेत. काँग्रेसनेही मुसंडी मारत दुसऱ्या क्रमांकावर आपले स्थान निश्चित केलं आहे.
80 जागांसाठी झालेल्या अकोला महापालिका निवडणुकीत भाजपाने 38 जागी विजय मिळविला आहे. ८० जागांपैकी 80 जागांचे निकाल लागले आहेत. त्यापैकी भाजपाने 38 जागा जिंकल्या आहेत. तर अकोला महापालिकेत काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे, काँग्रेस ने 21 जागांवर विजय मिळविला तर वंचित बहुजन आघाडी आणि उद्धवसेनेला फार चांगली कामगिरी करता आलेली नाही. स्वतंत्र लढत असलेल्या शिंदेसेनेला फारचा करिष्मा करता आलेला नाही. उद्धवसेनेचीही कामगिरी साधारणच राहिली आहे. भाजपासोबत युतीत लढत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षालाही चांगले प्रदर्शन करता आलेले नाही. राज्यासह अकोल्यात 15 जानेवारीला 29 महानगरपालिकांसाठी मतदान झाले. आज 16 जानेवारीला त्याचे निकाल जाहीर झाले.
अकोला महापालिकेत गेल्यावेळी एकहाती भाजपची सत्ता होती. तब्बल 80 पैकी 48 जागांवर भाजपने निर्विवाद वर्चस्व राखले होते. मात्र या निवडणुकीत मोठा फटका भाजपला बसला.. भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र लढली. यामध्ये भाजपला 38 तर अजित पवार गटाला केवळ एका जागी समाधान मानावे लागले. 80 सदस्यसंख्या असलेल्या महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 41 जागांची गरज आहे. शिंदे सेना भाजपला भेटली तरीही एक जागेची भाजपला गरज राहणार आहे. तर सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसनेही जुळवाजुळव सुरू केली असून काँग्रेसने 80 पैकी 21 जागांवर विजय मिळवला आहे. तर सोबत लढलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 3 जागांवर विजय मिळवला. तर राज्यात महाविकास आघाडीत सामील असलेल्या उद्धव सेनेला 6 जागांवर विजय मिळवला. तर वंचित बहुजन आघाडी ला 5 जागा जिंकता आल्या. एमआयएम 3 जागांवर विजयी झाली तर भाजप बंडखोर असलेल्या एका अपक्षाला विजय मिळवता आला. त्यामुळे अकोल्यात नेमकं कोण सत्ता स्थापन करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे.
संभाव्य मॅजिक फिगर!
भाजप : 38
शिंदेंची सेना : 01
राष्ट्रवादी काँग्रेस (अप): 01
मित्रपक्ष: 01
-------
एकूण 41
काँग्रेस : 21
राष्ट्रवादी शप : 03
शिवसेना ठाकरे : 06
एमआयएम: 03
वंचित आघाडी: 05
अपक्ष : 01
शिवसेना शिंदे : 01
अकोला महानगरपालिका पक्षीय बलाबल 2026
एकुण जागा- 80
भाजप - 38
शिवसेना शिंदे- 01
राष्ट्रवादी अजित पवार - 01
ठाकरे- 06
काँग्रेस- 21
मनसे-00
शरद पवार गट- 03
वंचित बहुजन आघाडी - 05
MIM 3
अपक्ष 1
शहर विकास आघाडी 01
एकूण घोषित 80
अकोला महापालिकेतील पक्षीय बलाबल 2017 :
भाजप - 48
शिवसेना - 8
काँग्रेस - 13
राष्ट्रवादी - 5
इतर - 6
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे