चंद्रपूर मनपात कोणाला स्पष्ट बहुमत नाही
चंद्रपूर, 16 जानेवारी (हिं.स.)। चंद्रपूर मनपात कोणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नाही. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दरम्यान महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांना अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला असून, या निकालामुळे शहराच्या राजकारणात मोठी
चंद्रपूर मनपात कोणाला स्पष्ट बहुमत नाही


चंद्रपूर, 16 जानेवारी (हिं.स.)। चंद्रपूर मनपात कोणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नाही. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दरम्यान महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांना अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला असून, या निकालामुळे शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

चंद्रपूरच्या माजी महापौर आणि भाजपच्या उमेदवार राखी कंचर्लावार यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला.

याचबरोबर काँग्रेसच्या बंडखोर व माजी नगराध्यक्ष सुनीता लोढीया यांनाही मतदारांनी नाकारले असून त्यांचा पराभव झाला आहे. तसेच भाजपचे दिग्गज उमेदवार देवानंद वाढई यांनाही निवडणुकीत अपयश आले आहे.

या निकालामुळे चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक निकालानंतर शहराच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

-------चंद्रपूर महापालिका-२०२६ स्थिती---

एकूण जागा --६६

भाजप ---- २३

कॉंग्रेस ---- २७

उबाठा-------०६

भारतीय शेतकरी कामगार पक्ष - ०३

बसपा-----०१

एमआयएम---०१

शिवसेना.------- ०१

वंचित---०२

अपक्ष -------- ०२

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande