
ठाणे, 16 जानेवारी (हिं.स.)। ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवारी 15 जानेवारी 2026 रोजी झालेल्या मतदानाच्या प्राप्त आकडेवारीनुसार एकूण 55.59 टक्के मतदान झाले असल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिली.
ठाणे महानगरपालिकेच्या एकूण 33 प्रभागांमध्ये एकूण 2013 मतदान केंद्रावर गुरूवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या 33 प्रभागांमध्ये 8 लाख 63 हजार 879 पुरूष, 7 लाख 85 हजार 831 महिला आणि 159 इतर असे एकूण 16 लाख 49 हजार 869 मतदार होते. त्यापैकी 483698 पुरूष , 433385 स्त्री आणि 40 इतर असे एकूण 917123 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला
प्रभागनिहाय मतदानाची आकडेवारी :
माजिवडा प्रभागसमिती - प्रभाग क्रमांक 1,2,3,8 - *54.75%*
वर्तकनगर प्रभाग समिती - प्रभाग क्रमांक 4,5,7 *54.86 %*
लोकमान्य सावरकरनगर -
प्रभाग क्रमांक 6,13,14,15-- *58.09%*
वागळे प्रभाग समिती -
प्रभाग क्रमांक 16,17,18---- *55.53%*
नौपाडा कोपरी -
प्रभाग क्रमांक 19,20,21,22---- *59.79%*
उथळसर -
प्रभाग क्रमांक 10,11,12-- *60.60 %*
कळवा
प्रभाग क्रमांक 9,23,24,25 -- *54.29 %*
मुंब्रा
प्रभाग क्रमांक 26, 31--- *47.59%*
मुंब्रा प्रभाग क्रमांक 30,32 ----*49.15%*
दिवा
प्रभाग क्रमांक. 27,28 ---- *57.37%*
दिवा प्रभाग क्रमांक. 29,33 ---- *56.45 %*
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर