एयू स्मॉल फायनान्स बँकेकडून आयसीएसआय सदस्यांना विशेष बँकिंग सुविधा
मुंबई, 17 जानेवारी, (हिं.स.)। देशातील सर्वात मोठी लघुवित्त बँक असलेल्या एयू स्मॉल फायनान्स बँकेने भारतीय कंपनी सचिव संस्था (आयसीएसआय) च्या सदस्यांसाठी विशेष बँकिंग सुविधा देण्याची घोषणा केली आहे. एयू स्मॉल फायनान्स बँक आणि आयसीएसआय यांच्यात शनिवार
AU Small Finance Bank


मुंबई, 17 जानेवारी, (हिं.स.)। देशातील सर्वात मोठी लघुवित्त बँक असलेल्या एयू स्मॉल फायनान्स बँकेने भारतीय कंपनी सचिव संस्था (आयसीएसआय) च्या सदस्यांसाठी विशेष बँकिंग सुविधा देण्याची घोषणा केली आहे.

एयू स्मॉल फायनान्स बँक आणि आयसीएसआय यांच्यात शनिवारी सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला. या कराराअंतर्गत देशभरातील कंपनी सचिवांसाठी खास तयार केलेल्या बँकिंग सेवा आणि क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

बँकेच्या निवेदनानुसार, या सामंजस्य कराराचा उद्देश आयसीएसआय सदस्यांना व्यापक बँकिंग सेवा देणे आणि बँकेत कंपनी सचिवांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा आहे. या भागीदारीअंतर्गत सदस्यांना विशेष चालू व बचत खाते सेवा तसेच व्यावसायिक गरजांना अनुरूप क्रेडिट कार्डची सुविधा मिळणार आहे. या सेवांची रचना प्रशासन, कामकाज व्यवस्थापन आणि वैयक्तिक आर्थिक गरजा लक्षात घेऊन करण्यात आली आहे. याशिवाय, पात्र सदस्यांसाठी बँक ‘जेनिथ क्रेडिट कार्ड’ सादर करत आहे, जे आयुष्यभर मोफत असेल. या कार्डवर प्रवासाशी संबंधित विशेष सुविधा तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय लाउंजमध्ये मोफत प्रवेशाचा लाभ मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande