
जळगाव, 17 जानेवारी (हिं.स.)आंतरराष्ट्रीय घडामोडीचा परिणाम देशांतर्गत सराफ बाजारावर पाहायला मिळत असून या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावमध्ये सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ झालेली आहे.दोन्ही धातूंचे दर गगनाला भिडले असून त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. सततच्या दरवाढीमुळे लवकरच सोन्याचा भाव दीड लाखांच्या पुढे जाऊ शकतो, असे तज्ज्ञ सांगत आहेत. तर चांदीचा भावही तीन लाखांचा आकडा पार करू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.जळगावमध्ये चांदीचा दर 24 तासांत सात हजार रुपयांनी वाढला आहे. तर सोन्याच्या दरातही 400 रुपयांनी वाढला आहे.आता नव्या दरानुसार चांदीचा भाव जीएसटीसह प्रतिकिलो 2 लाख 93 हजार 550 रुपयांवर पोहोचला आहे. सोन्याचा भावदेखील चांगलाच वाढला आहे.नव्या भावानुसार सोन जीएसटीसह 1 लाख 45 हजार 848 हजार रुपयांवर पोहोचले आहे. दरम्यान सध्या लग्नसराईसाठी मुहूर्त नाहीय. आगामी काही दिवसात लग्नसराईचा बार उडणार असून मात्र त्यापूर्वी दोन्ही धातूंनी विक्रमी पातळी गाठली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर