निस्सान इंडियासाठी गगन मंगल यांची कम्युनिकेशन्स प्रमुखपदी नियुक्ती
मुंबई, 17 जानेवारी (हिं.स.) : निस्सान मोटर इंडिया प्रा. लि. (NMIPL) ने गगन मंगल यांची नुकतीच कम्युनिकेशन्स प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. गुरुग्राम येथून काम पाहणारे मंगल NMIPL साठी संपूर्ण कम्युनिकेशन्स धोरणाचे नेतृत्व करतील. ते इंटरनॅशनल कम्युनिकेश
गगन मंगल


मुंबई, 17 जानेवारी (हिं.स.) : निस्सान मोटर इंडिया प्रा. लि. (NMIPL) ने गगन मंगल यांची नुकतीच कम्युनिकेशन्स प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. गुरुग्राम येथून काम पाहणारे मंगल NMIPL साठी संपूर्ण कम्युनिकेशन्स धोरणाचे नेतृत्व करतील. ते इंटरनॅशनल कम्युनिकेशन्सच्या उपाध्यक्षा कॅथरीन झॅकेरी यांना रिपोर्ट करतील तसेच NMIPL चे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वात्सा यांच्यासोबत कार्य करतील.

NMIPL चे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्सा म्हणाले, “निस्सान मोटर इंडिया मध्ये गगन यांचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या प्रवासातील एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर ते आमच्यात सामील होत आहेत. ऑटोमोबाईल कम्युनिकेशन्स क्षेत्रातील त्यांचा सखोल अनुभव आणि भारतीय मीडिया परिदृश्याची त्यांना असलेली जाण, ब्रँड पुनरुज्जीवनाच्या आमच्या प्रयत्नांना आणि रोमांचक आगामी उत्पादनांच्या लॉन्चपूर्व तयारीला बळ देईल. भारतात निसानची प्रभावी कथा उभारताना गगन यांचे नेतृत्व निर्णायक ठरेल.”

गगन मंगल यांनी निसानमध्ये सामील होण्यापूर्वी व्होक्सवॅगन इंडिया येथे प्रेस आणि मार्केटिंग कम्युनिकेशन्सचे नेतृत्व केले. व्यवस्थापन शाखेचे पदवीधर असलेले मंगल, व्होक्सवॅगन आणि ह्युंदाईसह अग्रगण्य वाहननिर्मिती कंपन्यांमध्ये १८ वर्षांहून अधिक कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स आणि मार्केटिंगचा समृद्ध अनुभव घेऊन येतात.

आपल्या कारकिर्दीत मंगल यांनी उत्पादन लॉन्च, मोठ्या कार्यक्रमांचे व्यवस्थापन, ब्रँड स्ट्रॅटेजी आणि विविध मोहिमा अशा क्षेत्रांत एकात्मिक कम्युनिकेशन्स धोरणे घडविण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या मागील भूमिकांमध्ये मजबूत मीडिया कथानक तयार करणे, कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी आखणे आणि राष्ट्रीय तसेच प्रादेशिक माध्यमांशी दृढ संबंध प्रस्थापित करणे या जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत.

नियुक्तीबद्दल बोलताना गगन मंगल म्हणाले, “निस्सान मोटर इंडियाच्या वाढ आणि परिवर्तनाच्या या निर्णायक टप्प्यावर कंपनीत सामील होणे माझ्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आहे. भारत निसानसाठी एक प्राधान्याचा बाजार असून येथे ब्रँडची प्रासंगिकता, विश्वासार्हता आणि ग्राहकांशी नाते बळकट करण्याच्या मोठ्या संधी आहेत. भारत आणि जगभरातील टीम्ससोबत घनिष्ठ सहकार्य करत ग्राहक-केंद्रित, स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण कथानक निर्माण करण्यास मी उत्सुक आहे—जे निसानच्या जागतिक उद्दिष्टांना प्रतिबिंबित करत भारतीय ग्राहकांशीही अर्थपूर्ण नाते जोडेल.”

आपल्या नवीन भूमिकेत मंगल भारतातील निसानच्या ब्रँड पुनरुज्जीवनाच्या प्रवासात प्रमुख भूमिका निभावतील, आगामी उत्पादन लॉन्चना सहाय्य करतील आणि कंपनीच्या कम्युनिकेशन्स तसेच मीडिया एंगेजमेंट प्रयत्नांना अधिक बळ देतील.

इंटरनॅशनल कम्युनिकेशन्सच्या उपाध्यक्षा कॅथरीन झॅकेरी म्हणाल्या, “गगन यांचा ऑटोमोबाईल कम्युनिकेशन्समधील सखोल अनुभव आणि भारतीय मीडिया परिदृश्याची त्यांना असलेली समज, निसानसाठी विशेषतः महत्त्वाची आहे. भारतात निसान एका उत्साहवर्धक नवीन टप्प्यात प्रवेश करत असताना त्यांचे नेतृत्व उपयुक्त ठरेल, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.”

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande