रत्नागिरी : दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी ॲड. बाबा परुळेकर
रत्नागिरी, 17 जानेवारी, (हिं. स.) : येथील दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या त्रैवार्षिक बिनविरोध निवडणुकीनंतर अध्यक्षपदी ॲड. प्रदीप ऊर्फ बाबासाहेब चंद्रकांत परुळेकर यांची फेरनिवड झाली. तर कार्याध्यक्षपदी सौ. दाक्षायणी सदानंद बोपर्डीकर आणि सचिवपदी राजीव
रत्नागिरी : दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी ॲड. बाबा परुळेकर


रत्नागिरी, 17 जानेवारी, (हिं. स.) : येथील दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या त्रैवार्षिक बिनविरोध निवडणुकीनंतर अध्यक्षपदी ॲड. प्रदीप ऊर्फ बाबासाहेब चंद्रकांत परुळेकर यांची फेरनिवड झाली. तर कार्याध्यक्षपदी सौ. दाक्षायणी सदानंद बोपर्डीकर आणि सचिवपदी राजीव सुहास गोगटे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.

शंभर वर्षांची शैक्षणिक परंपरा लाभलेल्या दि न्यू एज्युकेशन सोसायटीचा मोठा नावलौकिक आहे. या संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. उपाध्यक्षपदी ॲड. विनय वसंत आंबुलकर आणि ॲड. सौ. सुमिता धनंजय भावे यांची निवड झाली. संचालक मंडळामध्ये ॲड. सचिन गणपत शिंदे, शेखर वासुदेव शेट्ये, सौ. दाक्षायणी सदानंद बोपर्डीकर, गजानन दिगंबर तारगावकर, सीए मंदार लीलाधर जोशी, प्रणव गोविंद परांजपे आणि सौ. शुभांगी अजित वायकूळ यांची बिनविरोध निवड झाली. संचालक मंडळातून कार्याध्यक्षपदी सौ. दाक्षायणी बोपर्डीकर तर उपकार्याध्यक्षपदी शेखर शेट्ये यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या सचिवपदी राजीव सुहास गोगटे यांची निवड झाली आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande