इंदापूरचे माजी नगराध्यक्ष प्रदीप गारटकर यांचा भाजपात प्रवेश
मुंबई, 17 जानेवारी, (हिं.स.)। पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे माजी नगराध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी शनिवारी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे स्वागत केले. याव
इंदापूरचे माजी नगराध्यक्ष प्रदीप गारटकर यांचा भाजपात प्रवेश


मुंबई, 17 जानेवारी, (हिं.स.)। पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे माजी नगराध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी शनिवारी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे स्वागत केले. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, ज्येष्ठ नेते आ. सुरेश खाडे, आ.श्रीकांत भारतीय, प्रदेश सचिव नवनाथ पडळकर, प्रवीण माने आदी उपस्थित होते .

यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री. चव्हाण यांनी सांगितले की, या सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या सर्वांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. श्री.गारटकर यांनी सांगितले की, अनेक वर्षे स्थानिक राजकारणामुळे अन्य पक्षांमध्ये काम केले. मात्र भाजपा परिवाराबरोबर असलेली विचारांची नाळ कधीच तोडली नाही. या पुढील काळात पुणे जिल्ह्यात भाजपा वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करू .

श्री.गारटकर यांनी पतित पावन संघटनेचे पदाधिकारी म्हणून अनेक वर्षे काम केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी ८ वर्षे काम केले.

श्री.गारटकर यांच्याबरोबर इंदापूरचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननावरे, माजी उपनगराध्यक्ष राजेश शिंदे, नगरसेवक गणेश राऊत, सुधाकर ढगे, संजय शिंदे, वसीम भाई बागवान, हाजी नवाब बागवान, इंदापूर पालिकेतील विरोधी पक्ष नेते अनिल अण्णा पवार, अनिल राऊत, अविनाश मखरे, नौशाद मुलाणी, दादासाहेब जगताप आदींनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब होनमारे, शरद पवार गटाचे वाई अध्यक्ष नितीन सावंत यांनीही यावेळी भाजपामध्ये प्रवेश केला .

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande