लातूर - प्रभागातील सर्वसामान्यांची सेवा करा : आ.संजय बनसोडे
लातूर, 17 जानेवारी (हिं.स.)। उदगीर येथील नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टी या युतीला शहरातील जनतेने मोठा विश्वास दाखवून एक हाती सत्ता दिली त्यामुळेच आपण सर्व नगरसेवक एवढ्या मोठ्या संख्येने निवडून आला आहात आता
प्रभागातील सर्वसामान्यांची सेवा करा : माजी मंत्री आ.संजय बनसोडे


लातूर, 17 जानेवारी (हिं.स.)। उदगीर येथील नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टी या युतीला शहरातील जनतेने मोठा विश्वास दाखवून एक हाती सत्ता दिली त्यामुळेच आपण सर्व नगरसेवक एवढ्या मोठ्या संख्येने निवडून आला आहात आता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे ती शहरातील सर्वसामान्य घटकापर्यंत मूलभूत सुख सुविधा पोहोचविण्याची त्यामुळे सर्व नगरसेवकांनी प्रभागातील सर्वसामान्यांची सेवा करुन लातूर जिल्ह्यात आपल्या उदगीर नगर परिषदेचे नाव मोठे करावे असे मत माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.

ते उदगीर शहरातील उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाच्या सभागृहात आयोजीत लॉयन्स क्लबस इंटरनॅशनल व लॉयन्स क्लब उदगीर, उदयगिरी लॉयन्स धर्मादाय नेत्ररुग्णालय, उदगीर द्वारा आयोजित उदगीर नगरपरिषद निवडणुक २०२५ मध्ये निवडून आलेल्या नुतन नगराध्यक्षा व सर्व नुतन नगरसेवकांच्या सत्कार समारंभाप्रसंगी बोलत होते.

यावेळी उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटिया, नगराध्यक्षा सौ. स्वाती हुडे, उपनगराध्यक्षा सौ.शितल शिंदे, प्रदीप बेद्रे, सचिन हुडे, नरसिंग शिंदे, अॅड.बालाजी आदेप्पा, सुभाष वाकुडे, शशिकांत पेन्सलवार, अॅड.व्यंकट मोरे, बालाजी सोलापुरे, प्रभाकर पेन्सलवार, अॅड.राजकुमार नावंदर, डाॅ.भाग्यश्री घाळे, डाॅ.शेख अजहर, दिपक बलसुरकर, विजयकुमार पाटील, बाबुराव माशाळकर, दशरथ शिंदे, आदीसह नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी, उदगीरच्या विकासासाठी शहरातील जनतेने आपल्या सर्वांवर मोठा विश्वास दाखवून मत रुपी आशीर्वाद दिला आहे. त्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता 'उदगीरला स्मार्ट सिटी व ग्रीन शहर' करून लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात उदगीर नगर परिषदेचा नावलौकिक आपण सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनी करावा अशी अपेक्षा व्यक्त करून उदगीरच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी हातात हात घालून एकत्रितपणे काम करा असे आवाहन केले. यावेळी उदगीर शहरातील प्रतिष्ठित नागरिक विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande