
लातूर, 17 जानेवारी, (हिं.स.)। लातूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. १६ मधून भारतीय जनता पक्षाचे श्री. गिरीश पाटील व प्रभाग क्र. 6 मधून श्री. गणेश गवारे यांचा प्रचंड बहुमताने विजय झाला.
या विजयानंतर त्यांनी लातूर येथील पक्ष कार्यालयात येत, भेट घेतली. यावेळी त्यांचे भारतीय जनता पक्षाचे लातूर जिल्हा अध्यक्ष बसवराज पाटील यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी माजी मंत्री व आमदार श्री. संभाजी पाटील निलंगेकर, आमदार श्री. अभिमन्यू पवार, माजी आमदार श्री. शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी जिल्हाध्यक्ष श्री. दिलीपराव देशमुख तसेच भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis