
बीड, 18 जानेवारी (हिं.स.)। ओठावरचे शब्द, गीत, भाषा राष्ट्राचे भविष्य ठरवतात, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना स्वयंशिस्त आणि नैतिकतेचे धडे देणारे संस्कार केंद्र असल्याचे प्रतिपादन डॉ. सोमिनाथ खाडे यांनी केले.जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यनाथ कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे सात दिवसीय निवासी युवक-युवती शिबिराला वसंतनगर ग्रामपंचायतीत सुरुवात झाली.
शिबिर २१ जानेवारी दरम्यान होत आहे. शिबिराचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना संचालक प्रा. डॉ. सोमिनाथ खाडे आणि प्रा. प्राचार्य डॉ. जगदीश जगतकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून क्रिडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. पी.एल. कराड, प्रा. अरुण पवार, स्वामी, विजय राठोड, रावसाहेब चव्हाण, प्रा. हरिश मुंडे, डॉ. व्ही.बी. गायकवाड उपस्थित होते.
शिबिरात स्वयंसेवक विद्यार्थिनींनी 'राष्ट्रीय एकात्मता' आणि 'मुलगी सुरक्षित तर राष्ट्र सुरक्षित' या विषयांवर पथनाट्य सादर केले. प्रास्ताविक प्रा. माधव रोडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. भिमानंद गजभारे यांनी केले. प्रणव आघाव, सागर जगताप यांनी प्रतिनिधित्व केले. किरण गुट्टे, ओमकेश बांगर, नम्रता सरवदे, श्रुती सोळंके, मयुरी यांची उपस्थिती होती. शिबिरात शाश्वत विकास, जलव्यवस्थापन आणि पडीक जमीन विकासासाठी युवाशक्ती ही संकल्पना मांडण्यात आली. या प्रसंगी ग्रामस्थ उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis