
बीड, 18 जानेवारी, (हिं.स.)। अंबाजोगाई असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया, अंबाजोगाई शाखेच्या अध्यक्षपदी डॉ. नवनाथ घुगे यांची बिनविरोध निवड झाली.सचिवपदी डॉ. राहुल धाकडे यांची निवड झाली. बैठकीत ही कार्यकारिणी निवडण्यात आली. या बैठकीचे अध्यक्ष डॉ. एन.पी. देशपांडे होते.
या बैठकीत केज, धारूर, अंबाजोगाई व परिसरातील फिजिशियन डॉक्टरांना एकत्र आणून सामाजिक हितासाठी काम करण्याचा निर्णय झाला. देशभरातील एम.डी. मेडिसिन, डी.एन.बी. मेडिसिन, चेस्ट फिजिशियन, मधुमेह तज्ज्ञ यांची असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया ही संघटना कार्यरत आहे. अंबाजोगाई शाखेची स्थापना करून नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली.
उपाध्यक्षपदी डॉ. अनिल मस्के व डॉ. सचिन चौधरी यांची निवड झाली. सहसचिवपदी डॉ. अतुल शिंदे, कोषाध्यक्षपदी डॉ. विवेक मुळे, सहकोषाध्यक्षपदी डॉ. इम्रान पटेल यांची निवड झाली. मार्गदर्शक म्हणून डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, डॉ. एन.पी. देशपांडे, डॉ. शुभदा लोहिया, डॉ. संजय चव्हाण काम पाहणार आहेत. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे डॉ. गोपाळ पाटील, डॉ. संदीप थोरात, डॉ. अविनाश मुंडे यांनी अभिनंदन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis