पाटोदा, शिरूर तालुक्यातील ५ जणांचा विविध मनपामध्ये विजय
बीड, 18 जानेवारी (हिं.स.)। राज्यातील २९ नगर पालिका निवडणूकांचा निकाल शुक्रवार (१९ जानेवारी) रोजी जाहिर झाला. यात पाटोदा व शिरुर तालुक्यातील मुळ रहिवासी असलेल्या रेणुकादास वैद्य (रा. पाटोदा), सविता रामचंद्र सांगळे (रा. चिंचोली (नाथ) ता. पाटोदा), उज
पाटोदा, शिरूर तालुक्यातील ५ जणांचा विविध मनपामध्ये विजय


बीड, 18 जानेवारी (हिं.स.)।

राज्यातील २९ नगर पालिका निवडणूकांचा निकाल शुक्रवार (१९ जानेवारी) रोजी जाहिर झाला. यात पाटोदा व शिरुर तालुक्यातील मुळ रहिवासी असलेल्या रेणुकादास वैद्य (रा. पाटोदा), सविता रामचंद्र सांगळे (रा. चिंचोली (नाथ) ता. पाटोदा), उज्वला सुभाष जंगले (धनगर जवळका ता. पाटोदा) पुणे, बायजाबाई बबन नागरगोजे (रा. पिंपळनेर ता. शिरूर) पनवेल तर नवनाथ बन (रा. पाटोदा) यांचा मुंबई महानगर पालिकेच्या नगरसेवक पदाच्या निवडणुकीत विजय झाला आहे.

यातील सविता सांगळे यांनी शिवसेना तर इतर चौघांनी भारतीय जनता पक्षाकडून ही निवडणूक लढवली होती. पाटोदा, शिरूर तालुक्यातील या उमेदवारांना विजयी करण्यासाठी आमदार सुरेश धस यांनी प्रचार सभा घेवून उमेदवारांच्याविजयासाठी विशेष प्रयत्न केले. त्याच प्रमाणे पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या निवडणुकीतही आमदार सुरेश धस यांनी सभा घेतल्या होत्या. पाटोदा, शिरूरमधील या भूमीपूत्रांच्या विजयाबद्दल दोन्ही तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विकास विकासाच्या आवाहनाला राज्यातील जनतेने भरभरून प्रतिसाद दिला आहे. भारतीय जनता पक्ष हा विकासाच्या मुद्यांवर काम करणारा पक्ष आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे सरकार चांगले काम करीत आहे. पाटोदा, शिरूर तालुक्यातील भूमीपूत्रांनी महानगर पालिका निवडणूकीत मिळवलेला विजय हा अभिमानास्पद आहे, या सर्व नगरसेवकांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आमदार सुरेश धस यांनी आश्वासित केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande