स्वारातीमधील सेवेचा खा. बजरंग सोनवणे घेणार आढावा
बीड, 18 जानेवारी (हिं.स.)।अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे रुग्णसेवा, आरोग्य सुविधा, मनुष्यबळ, औषध साठा, पायाभूत सुविधा तसेच प्रलंबित विविध प्रश्नांबाबत खा. बजरंग सोनवणे हे सविस्तर आढावा घेणार असून ह
स्वारातीमधील सेवेचा खा. बजरंग सोनवणे घेणार आढावा


बीड, 18 जानेवारी (हिं.स.)।अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे रुग्णसेवा, आरोग्य सुविधा, मनुष्यबळ, औषध साठा, पायाभूत सुविधा तसेच प्रलंबित विविध प्रश्नांबाबत खा. बजरंग सोनवणे हे सविस्तर आढावा घेणार असून ही आढावा बैठक सोमवारी दुपारी १२.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे.

बीड लोकसभा मतदारसंघाचे खा. बजरंग मनोहर सोनवणे यांच्या पुढाकारातून सदर बैठक आयोजित करण्यात येत असून यासंदर्भात रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनास पत्राद्वारे सूचना ही दिल्या आहेत. सदर बैठकीस संबंधित तसेच प्रशासनातील जबाबदार अधिकारी उपस्थित राहणार आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार व वेळेवर आरोग्यसेवा मिळावी, रुग्णालयातील सुविधा अधिक सक्षम व्हाव्यात तसेच दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या अडचणींवर ठोस निर्णय घेण्यात यावा, या उद्देशाने ही आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या बैठकीत रुग्णसेवेशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करून आवश्यक त्या उपाययोजना सुचविण्यात येणार असून, आरोग्य यंत्रणेमधील समन्वय अधिक बळकट करण्यावर भर दिला जाणार आहे. खा. बजरंग सोनवणे यांनी बीड जिल्ह्यात, आरोग्य, शिक्षण, दळवळण अशा विषयांना कायम महत्व दिलेले आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande