
नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर राहावे - माजी मंत्री दिलीपराव देशमुख
लातूर, १८ जानेवारी (हिं.स.) महानगर पालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीने ४७ जागेवर ऐतिहासिक विजय संपादन केला असून याबद्दल शहरातील विविध प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेवक, काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांची भेट घेतली यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकाचे अभिनंदन करून दिलीपराव देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या व नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर राहावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक धोंडीराम यादव इसरार सगरे, सपना किस्वे तब्बसुंम शेख, योगेश स्वामी, सतीश साळुंके,यांच्यासह कोंग्रेसचे पदाधिकारी श्री कातळे, रामभाऊ कोंबडे,संभाजी सुळ, गोविन्द मदने, चांदपाशा इनामदार शिवाजी कांबळे
रेणा साखर कारखान्याचे माजी चेअरमन आबासाहेब पाटील मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सचिन पाटील,संभाजी रेड्डी तसेच वीविध प्रभागातील तसेच ग्रामीण भागातील पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते
*नूतन नगरसेवकांनी नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर राहावे
यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी लातूरच्या जनतेने विकासाला प्राधान्य देवुन मोठा कौल काँग्रेसला दिलेला आहे असे सांगून लोकांच्या सेवेसाठी तत्पर राहावे असे आवाहन करत उपस्थित
नागरिक सर्वांचे अभिनंदन केले आभार मानले.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis