
बीड, 18 जानेवारी (हिं.स.)।बीड जिल्ह्यात रब्बी हंगामाची पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्याच्या पेरणी क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय बदल झाला आहे. यंदा जिल्ह्याने रब्बीच्या सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा ओलांडला आहे. तब्बल ४३,७२५ हेक्टरने पेरणी वाढली आहे. विशेष म्हणजे यंदा हरबरा २३, २७१ हेक्टरने घटला आहे. ज्वारीच्या क्षेत्रात ९,४२० हेक्टरने वाढ झाली आहे.
यावर्षी लांबलेल्या पावसामुळे आणि रब्बीच्या पेरणीला झालेल्या विलंबामुळे पॅक पॅटर्नमध्ये कमालीचा बदल दिसून येत आहे. गेल्या वर्षी २०२४ २५ जिल्ह्यात ्एकूण ४ लाख ५५ हजार ८३१ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली होती. यावर्षी जिल्ह्याचा एकूण पेरणी आकडा ५ लाख हेक्टरच्या जवळ पोहोचला आहे. सर्वात महत्त्वात्ची बाब म्हणजे रब्बी ज्वारीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ज्वारीचे क्षेत्र १ लाख ८० हजार ५८० हेक्टर होते, जे यंदा १ लाख ९० हजार हेक्टरच्या पुढे गेले आहे. याउलट, गेल्या वर्षी सर्वाधिक पेरा असलेल्या हरभऱ्याच्या क्षेत्रात यंदा काही प्रमाणात घट दिसून येत आहे. आष्टी ८२ हजार ८५५ हे. आणि केज ८१ हजार २६७ हे. या दोन तालुक्यांनी जिल्ह्यात आघाडी घेतली आहे.
जिल्ह्याचा एकूण पेरणी आकडा यंदा पाच लाख हेक्टरपर्यंत पोहोचला
शेतकऱ्यांनी नियोजन करून हरबऱ्याचे पीक वाढवले आहे.
ज्वारीची पेरणी बीड तालुक्यात ४ हजार २६२ हेक्टर तर पाटोद्यात ३६ हजार २२३ हे. ज्वारी पेरली. हरभऱ्याचे सर्वाधिक क्षेत्र अंबाजोगाई तालुक्यात असून ४० हजार ९०५ हे. हरभरा पेरला. केजमध्ये ३४ हजार ९२१ हे. पेरणी झाली. गहू केज आणि आष्टी तालुक्यात मोठे आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis