नांदेडचा १५ वा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे लक्ष
नांदेड, 18 जानेवारी (हिं.स.)। नांदेड नगरपालिका १९५२ मध्ये तर नांदेड वाघाळा महापालिका १९९७ मध्ये अस्तिवात आली. नगरपालिका असताना ४५ वर्षाच्या कालावधीत जवळपास २३ जणांना नगराध्यक्ष होण्याची संधी मिळाली तर महापालिका स्थापन झाल्यावर आत्तापर्यंत १४ जणांना
नांदेडचा १५ वा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे लक्ष


नांदेड, 18 जानेवारी (हिं.स.)। नांदेड नगरपालिका १९५२ मध्ये तर नांदेड वाघाळा महापालिका १९९७ मध्ये अस्तिवात आली. नगरपालिका असताना ४५ वर्षाच्या कालावधीत जवळपास २३ जणांना नगराध्यक्ष होण्याची संधी मिळाली तर महापालिका स्थापन झाल्यावर आत्तापर्यंत १४ जणांना महापौर होण्याची संधी मिळाली आहे. आता निवडणुका संपल्या असून नांदेड नगरीचा १५ वा महापौर कोण होणार याची उत्सुकता नांदेडकरांना लागली आहे. महापौर पदासाठीची आरक्षण सोडत मंत्रालयात काढण्यात येणार असून त्या सोडतीकडे मतदारांसह इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

नांदेड नगरीचे प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान ज्येष्ठ नेते कै. शंकरराव चव्हाण यांना मिळाला होता त्यानंतर नांदेड वाघाळा महापालिका १९९७ मध्ये अस्तित्वात आली. पहिले महापौर म्हणून शिवसेनेचे सुधाकर पांढरे होते.

आत्तापर्यंतचे महापौर

१) सुधाकर पांढरे (शिवसेना) १९९७ ते १९९८

२) मंगला निमकर (काँग्रेस) १९९८ ते १९९९

३) गंगाधर मोरे (काँग्रेस) : १९९९ ते २००२

४) ओमप्रकाश पोकर्णा (काँग्रेस): २००२ ते २००५

५) अ. शमीम बेगम अ. हफीज (काँग्रेस) : २००५ ते २००७

६) बलवंतसिंघ गाडीवाले (काँग्रेस) : २००७ ते २००९

७) प्रकाशचंद मुथा (काँग्रेस) : २००९ ते २०१०

८) अजयसिंह बिसेन (काँग्रेस) २०१० ते २०१२

९) अब्दुल सत्तार (काँग्रेस) : २०१२ ते २०१५

१०) शैलजा स्वामी (काँग्रेस) २०१५ ते २०१७

११) शीलाताई भवरे (काँग्रेस) २०१७ ते २०१९

१२) दीक्षा धबाले (काँग्रेस) २०१९ ते २०२०

२०२० ते २०२१ १३) मोहिनी येवनकर (काँग्रेस)

१४) जयश्री पावडे (काँग्रेस) २०२१ ते २०२२

(१ नोव्हेंबर २०२२ पासून प्रशासकीय काळ सुरू)

१ नोव्हेंबर २०२२ पासून प्रशासकीय काळ

महापालिकेच्या मागील २०१७ च्या निवडणुकीनंतर मुदत दि. ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी संपली होती. त्यानंतर दि. १ नोव्हेंबर २०२२ ला प्रशासकीय काळ लागू झाला. पहिले प्रशासक म्हणून आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी काम पाहिले. त्यांची दि. १ जून २०२३ ला बदली झाली. त्यानंतर दुसरे प्रशासक म्हणून आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दि. १ जून २०२३ रोजी सुत्रे स्वीकारली असून ते सध्या प्रशासक म्हणून काम पाहत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande