
नांदेड, 19 जानेवारी (हिं.स.)।
नांदेड येथे दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या “हिंद दि चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सदर वारकरी संमेलनाच्या अनुषंगाने आज कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा समाजबांधवांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
या पूर्वतयारी पाहणीवेळी हिंद दि चादर”च्या नांदेड क्षेत्रिय समितीचे अशासकीय सदस्य ॲड. संतोष राठोड, संत नामदेव मंदिर ट्रस्टचे सचिव द्वारकादास सारडा, सुखबीर सिंग अलग, अंबादास दळवी, संदीप राठोड, विकास राठोड, प्रीतम राठोड, सचिन जाधव यांच्यासह अन्य मान्यवर व समाजबांधव उपस्थित होते.
या वारकरी संमेलनातून संत नामदेव महाराजांच्या विचारांचा प्रसार होऊन सामाजिक एकात्मता, सद्भावना व आध्यात्मिक जागृतीला चालना मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या व्यवस्थेबाबत सविस्तर पाहणी करून उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis