लाडक्या बहिणींवर अन्याय होऊ देणार नाही- आ. रणधीर सावरकर
अकोला, 19 जानेवारी (हिं.स.)।लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत महिलांना मिळणारा हक्काचा लाभ कोणत्याही परिस्थितीत बंद होऊ देणार नाही, असे अभिवचन आमदार रणधीर सावरकर यांनी दिले. ग्रामीण व शहरी भागातील महिलांना या योजनेचा संपूर्ण लाभ मिळावा, यासाठी शासन दरबार
लाडक्या बहिणींवर अन्याय होऊ देणार नाही- आ. रणधीर सावरकर


अकोला, 19 जानेवारी (हिं.स.)।लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत महिलांना मिळणारा हक्काचा लाभ कोणत्याही परिस्थितीत बंद होऊ देणार नाही, असे अभिवचन आमदार रणधीर सावरकर यांनी दिले. ग्रामीण व शहरी भागातील महिलांना या योजनेचा संपूर्ण लाभ मिळावा, यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आज महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालयात लाडक्या बहिणी योजनेच्या लाभासंदर्भात हजारो महिलांनी गर्दी केल्याची माहिती मिळताच, जनतेच्या समस्या तत्काळ समजून घेणारे आणि दिवसाचे तब्बल १८ तास नागरिकांसाठी कार्यरत असलेले आमदार रणधीर सावरकर यांनी त्वरित महिला व बालकल्याण अधिकारी गिरीश पुसतकर यांच्या कार्यालयाला भेट दिली.

यावेळी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान अनेक महिलांचे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे चुकीच्या केवायसीमुळे बंद झाल्याचे निदर्शनास आले. केवायसी प्रक्रियेदरम्यान विचारण्यात आलेले तांत्रिक प्रश्न महिलांना नीट न समजल्याने तसेच प्रणालीतील त्रुटींमुळे केवायसी चुकीची भरली गेल्याचे स्पष्ट झाले. महिलांच्या भावना समजून घेत आमदार सावरकर यांनी उपस्थित महिलांना आणि त्यांच्या सोबत आलेल्या पुरुष मंडळींना धीर दिला. शासन दरबारी हा प्रश्न प्रभावीपणे मांडून केवायसी दुरुस्तीसाठी स्वतंत्र पर्याय (ऑप्शन) सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. “माझ्या लाडक्या बहिणींचे हक्काचे पैसे मी कोणत्याही परिस्थितीत बंद होऊ देणार नाही,” असे ठाम शब्दांत त्यांनी सांगितले. या वेळी अंबादास उमाळे, विठ्ठल चतरकर, राजेश बेले, अनिल गावंडे, वैभव माहुरे, नारायण बोर्डे, अंकुश इंगळे, राजेश ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande