उदगीरच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींची नवी टीम सज्ज : आ. संजय बनसोडे
लातूर, 19 जानेवारी (हिं.स.)। शहराच्या विकासासाठी नवी लोकप्रतिनिधींची टीम सज्ज असून शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी केले. उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्ररुग्णालयाच्या वतीने लॉ. अश
उदगीरच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींची नवी टीम सज्ज : आ. संजय बनसोडे


लातूर, 19 जानेवारी (हिं.स.)।

शहराच्या विकासासाठी नवी लोकप्रतिनिधींची टीम सज्ज असून शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी केले. उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्ररुग्णालयाच्या वतीने लॉ. अशोकभाई मेहता सभागृहात आयोजित उदगीर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्ररुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटीया होते. आ. संजय बनसोडे म्हणाले की, उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्ररुग्णालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणारे नेत्रतपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व जनजागृती उपक्रम हे ग्रामीण व शहरी भागातील गरजू नागरिकांसाठी वरदान ठरत आहेत. अंधत्व निवारणासाठी लायन्स चळवळीचे योगदान मोलाचे असून अशा समाजोपयोगी आरोग्य उपक्रमांना

शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल.

यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्षा स्वाती सचिन हुडे तसेच सर्व उपस्थित नगरसेवकांचा सन्मानपत्र, शाल व श्रीफल देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. नगराध्यक्षा स्वाती हुडे यांनी मनोगतात उदगीर शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण व नागरी सुविधा यासंदर्भातील प्रत्येक प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा निर्धार व्यक्त केला. शहराचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी सर्व नगरसेवक, प्रशासन व नागरिकांना विश्वासात घेऊन समन्वयाने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात डॉ. रामप्रसाद लखोटीया यांनी लायन्स क्लबच्या सामाजिक, आरोग्य व अंधत्व निवारण क्षेत्रातील कार्याची माहिती देत नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande